जमवाजमव सुरू; तामिळनाडूत विजय यांचा शपथविधी लांबणीवर? काँग्रेसचा पाठिंबा X
राष्ट्रीय

जमवाजमव सुरू; तामिळनाडूत विजय यांचा शपथविधी लांबणीवर? काँग्रेसचा पाठिंबा

तामिळनाडूमध्ये गुरूवार सात मे रोजी होणार असलेला बहुचर्चित नव्या सरकारचा शपथविधी समारंभ पुढे ढकलला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 'टीव्हीके'चे प्रमुख विजय यांनी बुधवारी सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी 'लोक भवन' येथे राज्यपालांची भेट घेतली आणि विधानसभेच्या ११३ आमदारांच्या पाठिंब्याची पत्रे सादर केली.

Swapnil S

चेन्नई : तामिळनाडूमध्ये गुरूवार सात मे रोजी होणार असलेला बहुचर्चित नव्या सरकारचा शपथविधी समारंभ पुढे ढकलला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 'टीव्हीके'चे प्रमुख विजय यांनी बुधवारी सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी 'लोक भवन' येथे राज्यपालांची भेट घेतली आणि विधानसभेच्या ११३ आमदारांच्या पाठिंब्याची पत्रे सादर केली. या पाठिंब्याच्या पत्रांवर 'टीव्हीके'च्या १०७ आणि काँग्रेस पक्षाच्या ५ मागणी केली. आर्लेकर यांनी विजय यांच्याकडे ११८ आमदारांच्या पाठिंब्याच्या पत्रांची राज्यपालांच्या या निर्णयामुळे हा सोहळा पुढे ढकलला जाऊ शकतो.

आमदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. तथापि, सूत्रांनी दिलेल्या असलेला माहितीनुसार, राज्यपाल राजेंद्र विजय यांनी आवश्यक असलेला आमदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी अतिरिक्त वेळेची विनंती राज्यपालांना केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, चेन्नईतील नेहरू स्टेडियममध्ये शपथविधीची जय्यत तयारी सुरू असून, काँग्रेस नेते राहुल गांधी या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

काँग्रेसच्या पाच आमदारांनी दिला पाठिंबा

तामिळनाडूच्या २३४ सदस्यांच्या विधानसभेत, 'टीव्हीके'कडे १०८ जागा आहेत. तथापि, विजय यांनी दोन मतदारसंघांतून विजय मिळवल्यामुळे, ते एक जागा रिक्त करतील. त्यामुळे पक्षाच्या आमदारांची एकूण संख्या १०७ होईल. तसेच राज्यात एकूण जागांची संख्या प्रभावीपणे २३३ असली तरीही, बहुमताचा आकडा हा ११८ हाच असणार आहे. परिणामी, 'टीव्हीके' ला आणखी ११ आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. सध्या, काँग्रेसच्या पाच आमदारांचा पाठिंबा पक्षाने मिळवला आहे. त्यामुळे त्यांना आणखी ६ आमदारांचा पाठिंबा हवा आहे. अन्य पक्षांमध्ये व्हीसीके, मार्क्सवादी कम्युनिस्ट, भारतीय कम्युनिस्ट तसेच मुस्लिम लीग यांचे प्रत्येकी दोन तर डीमडीकेचा एक आमदार आहे. या पक्षांनी विजय यांना पाठिंबा देण्यासाठी अनुकूलता दर्शवली असली तरी रात्री उशिरापर्यंत पत्र दिलेले नव्हते.

याच दरम्यान अण्णा द्रमुकमध्ये फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात असून वीस आमदार विजय यांच्यासोबत जातील अशी चर्चा सुरू झाली आहे. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी विजय यांची धावाधाव सुरू असतानाच घोडेबाजार टाळण्यासाठी नवनिर्वाचित आमदारांना सुरक्षित स्थळी हलवल्याच्या बातम्याही समोर येत आहेत. बुधवारी, 'टीव्हीके'ने आपल्या सर्व नवनिर्वाचित आमदारांना महाबलीपुरम, चेंगलपट्ट येथे असलेल्या 'फोर पॉइंट्स' नावाच्या रिसॉर्टमध्ये हलवले आहे.

विजयविरोधात याचिका

आर्थिक व्यवहारांची माहिती लपवल्याच्या आणि मानधन म्हणून बेहिशोबी रोकड स्वीकारल्याच्या आरोपाखाली अभिनेते विजय यांच्याविरुद्ध फसवणूक आणि मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवण्यासाठी कोडुंगयूर येथील एका रहिवाशाने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यानुसार न्यायालयाने ग्राह्यता तपासण्यासाठी नोंदणी विभागाला हे प्रकरण सूचीबद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. हा आदेश नुकताच प्रसिद्ध झाला असून, न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टीनंतर या प्रकरणावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

मराठी पाट्या लावण्याचा नियम सर्रास धाब्यावर; ३ हजारांहून अधिक आस्थापनांना न्यायालयाचा दणका; १ कोटी ९१ लाखांचा दंड वसूल

हिंदीच्या परीक्षेला सरकारची स्थगिती; मराठी अभ्यास केंद्राच्या इशाऱ्यानंतर निर्णय

Mumbai : रुग्णालय स्वच्छता कंत्राटाची चौकशी होणार; प्रस्ताव येण्याआधीच वर्क ऑर्डर- 'स्थायी'मध्ये खडाजंगी

आवडते-नावडते विरोधक हा निरंतर खेळ

Mother’s Day 2026 : आईसाठी निवडा खास गिफ्ट; रोजच्या आयुष्यात मिळेल आराम, पाहा सोप्या आयडियाज