राष्ट्रीय

Vande Metro : उद्यापासून धावणार देशातील पहिली वंदे मेट्रो! अहमदाबाद-भूज सेवा होणार सुरू, स्पीड किती?

वंदे मेट्रोच्या स्वदेशी बनावटीच्या ट्रेनमध्ये १२ वातानुकूलित डबे आहेत. यामध्ये केंद्रीय नियंत्रित स्वयंचलित स्लाइडिंग दरवाजे, मॉड्यूलर इंटीरियर्स, सतत एलईडी लाइटिंग, व्हॅक्यूम इव्हॅक्युएशनसह शौचालये, मार्ग नकाशा आहे. इंडिकेटर, पॅनोरॅमिक विंडो, सीसीटीव्ही, फोन चार्जिंग सुविधा, अलार्म सिस्टम आणि एरोसोल आधारित अग्निशामक प्रणालीसह स्वयंचलित धूर/आग शोधणे यांचा समावेश या ट्रेनमध्ये आहे.

Swapnil S

मुंबई : देशातील पहिली वंदे मेट्रो ट्रेन अहमदाबाद आणि भूज स्थानकांदरम्यान मंगळवार १७ सप्टेंबरपासून धावणार आहे. वंदे मेट्रोमुळे कच्छमध्ये रोजगार निर्मिती आणि स्थानिक पर्यटनाला चालना मिळणार आहे. ताशी ११० कि.मी. वेगाने ही मेट्रो ट्रेन धावणार आहे.

वंदे मेट्रोच्या स्वदेशी बनावटीच्या ट्रेनमध्ये १२ वातानुकूलित डबे आहेत. यामध्ये केंद्रीय नियंत्रित स्वयंचलित स्लाइडिंग दरवाजे, मॉड्यूलर इंटीरियर्स, सतत एलईडी लाइटिंग, व्हॅक्यूम इव्हॅक्युएशनसह शौचालये, मार्ग नकाशा आहे. इंडिकेटर, पॅनोरॅमिक विंडो, सीसीटीव्ही, फोन चार्जिंग सुविधा, अलार्म सिस्टम आणि एरोसोल आधारित अग्निशामक प्रणालीसह स्वयंचलित धूर/आग शोधणे यांचा समावेश या ट्रेनमध्ये आहे.

ट्रेन क्रमांक ९४८०१ अहमदाबाद-भूज वंदे मेट्रो अहमदाबादहून शनिवार वगळता दररोज सायंकाळी ५:३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ११:१० वाजता भूजला पोहोचेल. ही मेट्रो १७ सप्टेंबर २०२४ पासून धावेल. त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक ९४८०२ भूज-अहमदाबाद वंदे मेट्रो ही भूज येथून रविवार वगळता दररोज सकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी रात्री १०:५० वाजता अहमदाबादला पोहोचेल. हे वेळापत्रक १८ सप्टेंबर २०२४ पासून लागू होईल.

ही गाडी साबरमती, चांदलोडिया, विरमगाम, ध्रंगध्रा, हलवड, समखियाली, भचौ, गांधीधाम आणि अंजार स्थानकावर दोन्ही दिशेने थांबेल. गाडी थांबण्याच्या वेळा आणि रचना यासंबंधी तपशीलवार माहिती www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळावर प्रवाशांना पाहता येणार आहे.

अहमदाबाद आणि भूज दरम्यानच्या वंदे मेट्रोच्या रूपात देशाला पहिली वंदे मेट्रो लाभणार आहे.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता: जुळ्या बोगद्यांच्या बांधणीचा मार्ग मोकळा

दिशा सालियनचा मृत्यू अपघातीच, मुंबई पोलीस ठाम ; भूमिका स्पष्ट करण्याचे राज्य सरकारला निर्देश