राष्ट्रीय

मोईत्रा, हिरानंदानी यांना पुन्हा समन्स

डिसेंबर महिन्यात मोईत्रा यांची अनैतिक वागणुकीबद्दल लोकसभेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याप्रकरणी (कॅश फॉर क्वेरी)सीबीआयने मोईत्रा यांच्या निवासस्थानी छापे टाकले होते.

Swapnil S

नवी दिल्ली : परकीय चलन व्यवस्थापन कायद्याचे (फेमा) उल्लंघन केल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा आणि उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्यावर नव्याने समन्स बजावले असून त्यांना गुरुवारी चौकशीसाठी पाचारण केले आहे. सक्तवसुली संचालनालयाने यापूर्वीही महुआ मोईत्रा यांना चौकशीसाठी पाचारण केले होते.

डिसेंबर महिन्यात मोईत्रा यांची अनैतिक वागणुकीबद्दल लोकसभेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याप्रकरणी (कॅश फॉर क्वेरी)सीबीआयने मोईत्रा यांच्या निवासस्थानी छापे टाकले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर हल्ला चढविण्यासाठी मोईत्रा यांनी दुबईस्थित उद्योगपती हिरानंदानी यांच्याकडून रोख रक्कम आणि मौल्यवान भेटवस्तू स्वीकारल्या होत्या, असा आरोप भाजपचे निशिकान्त दुबे यांनी लोकसभेत केला होता.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश