राष्ट्रीय

ईव्हीएम पडताळणीवरील सुनावणी ‘त्याच’ पीठासमोर व्हावी!

मतपत्रिकांद्वारे मतदान घेण्याची मागणी करणारी याचिका एप्रिल महिन्यात ज्या पीठाने फेटाळली होती त्याच पीठासमोर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) पडताळणीचे धोरण ठरविण्याबाबतच्या याचिकेवर सुनावणी झाली पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले.

Swapnil S

नवी दिल्ली : मतपत्रिकांद्वारे मतदान घेण्याची मागणी करणारी याचिका एप्रिल महिन्यात ज्या पीठाने फेटाळली होती त्याच पीठासमोर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) पडताळणीचे धोरण ठरविण्याबाबतच्या याचिकेवर सुनावणी झाली पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. ईव्हीएमबाबतची याचिका सुनावणीसाठी आली तेव्हा न्या. विक्रम नाथ आणि न्या. पी. बी. वैराळे यांच्या पीठाने सवाल केला की, याबाबतची सुनावणी एप्रिल महिन्यात निकाल देणाऱ्या पीठासमोर का होणार नाही? त्यानंतर ज्येष्ठ वकील शंकरनारायणन यांनी एप्रिल महिन्यात ज्या पीठाने मतपत्रिकांद्वारे मतदान घेण्याची याचिका फेटाळली होती त्याची माहिती दिली. त्यानंतर, म्हणूनच आपण म्हणत आहोत की, याचिका त्याच पीठासमोर सुनावणीसाठी गेली पाहिजे, असे न्या. नाथ म्हणाले.

"भगवा आणि हिंदुत्वाचा विजय"; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष ठरल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांना अश्रू अनावर

2008 Malegaon Blast : 'दंगलींचे शहर' बॉम्बस्फोटाने काळवंडले! मालेगावच्या इतिहासातील काळा दिवस

"भारत-रशियाने मिळून त्यांची आधीच डबघाईस आलेली अर्थव्यवस्था..."; टॅरिफच्या तडाख्यानंतर ट्रम्प यांचा थेट निशाणा

2008 Malegaon Blast : ठोस पुरावेच नाही! साध्वी प्रज्ञा, पुरोहित यांच्यासह सातही आरोपी निर्दोष, १७ वर्षांनंतर आला निकाल

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’