राष्ट्रीय

वाढीव पेन्शनसाठी शेवटची तारीख आता ११ जुलै

उच्च पेन्शनसाठी अर्ज करण्याची मूळ मुदत ३ मार्च होती, जी दोनदा वाढवण्यात आली. आधी ३ मे आणि नंतर ती २६ जूनपर्यंत वाढवण्यात आली होती

नवशक्ती Web Desk

कर्मचारी पेन्शन योजनेतून (ईपीएस) उच्च निवृत्ती वेतनासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख सोमवारी, २६ जून २०२३ होती. ही मुदत आता वाढवण्यात आली असून ११ जुलैपर्यंत करण्यात आली आहे. अर्जदारांना ‘ईपीएफओे’ ​​पोर्टलद्वारे अर्ज सादर करण्यात अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने ही मुदत पुन्हा वाढवण्यात आली आहे. उच्च पेन्शनसाठी अर्ज करण्याची मूळ मुदत ३ मार्च होती, जी दोनदा वाढवण्यात आली. आधी ३ मे आणि नंतर ती २६ जूनपर्यंत वाढवण्यात आली होती. आता ती पुन्हा वाढवण्यात आली आहे.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत