राष्ट्रीय

जुनी पेन्शन मिळणार नाही! केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

अर्थमंत्र्यांना खासदार ए. गणेशमूर्ती व ए. राजा यांनी विचारले की, सरकारी कर्मचाऱ्यांच्या असोसिएशनने नवीन पेन्शनऐवजी जुनी पेन्शन देण्याची मागणी केली.

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : देशात जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी सरकारी कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे. यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांकडून दबाव तंत्र वापरले जात आहे. पण, केंद्र सरकारने जुनी योजना लागू करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असे सोमवारी संसदेत स्पष्ट केले.

अर्थमंत्र्यांना खासदार ए. गणेशमूर्ती व ए. राजा यांनी विचारले की, सरकारी कर्मचाऱ्यांच्या असोसिएशनने नवीन पेन्शनऐवजी जुनी पेन्शन देण्याची मागणी केली. त्यावर सरकारचे काय म्हणणे आहे. त्यावर अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले की, १ जानेवारी २००४ नंतर नियुक्त झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ देण्याचा केंद्राचा कोणताही प्रस्ताव नाही.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन