नवी दिल्ली : तिहेरी तलाकप्रकरणी आतापर्यंत किती पुरुषांविरोधात एफआयआर आणि आरोपपत्र ठेवली आहेत, याची माहिती द्या, असे सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला बुधवारी सांगितले.
सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने याबाबतची सुनावणी घेतली. केंद्र सरकारच्या तिहेरी तलाक कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे.
पुढील सुनावणी १७ मार्चनंतर
सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारकडून या कायद्याबाबत संपूर्ण माहिती मागवली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी १७ मार्चनंतर होणार आहे. सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना तीन आठवड्यांत लेखी उत्तरे दाखल करण्यास सांगितले आहे.