राष्ट्रीय

स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरी निमित्त घरात रात्रंदिवस फडकवता येणार तिरंगा

आतापर्यंत जनतेला सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत राष्ट्रध्वज फडकावण्याची परवानगी होती

वृत्तसंस्था

स्वातंत्र्याची पंचाहत्तरी काही दिवसांवर येऊन ठेपली असताना केंद्र सरकारने स्वातंत्र्य दिनापूर्वी ‘प्रत्येक घरी तिरंगा समारोह’मधून तिरंगा फडकवण्याच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. त्यामुळे आता प्रत्येक जण आपल्या घरात रात्रंदिवस तिरंगा फडकवू शकतो. आतापर्यंत जनतेला सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत राष्ट्रध्वज फडकावण्याची परवानगी होती. एका वृत्तवाहिनीने केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांचे एक पत्र अॅक्सेस केले आहे. जे त्यांनी २० जुलैला सर्व सचिवांना लिहिले होते. तिरंगा फडकवण्याचे नवे नियम त्याच दिवसापासून लागू होणार असल्याचे या पत्रात म्हटले आहे. पत्रात नवीन नियमांबाबत म्हटले आहे की, भारतीय ध्वज संहिता २००२मध्ये आणखी सुधारणा करण्यात आल्या आहेत. नवीन नियमानुसार, राष्ट्रध्वज कोणत्याही मोकळ्या जागेवर किंवा कोणत्याही लोकप्रतिनिधीच्या घरात फडकवला जात असेल तर आता तो दिवसरात्र फडकवता येईल.

यापूर्वी असा नियम होता की, जेव्हा राष्ट्रध्वज एखाद्या मोकळ्या जागेवर फडकवला जातो, तेव्हा तो सूर्योदय आणि सूर्यास्तापर्यंत शक्यतोवर फडकवला जावा, मग हवामान कसेही असो.

३० कोटी घरांमध्ये तिरंगा फडकवण्याचे लक्ष्य

‘हर घर तिरंगा’ सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आणि आपल्या घरात राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आल्याचे गृह सचिवांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. यंदा आपण स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करत आहोत, प्रत्येक घरोघरी तिरंगा चळवळ बळकट करू या. १३ ते १५ ऑगस्टपर्यंत घरात तिरंगा फडकवा. केंद्रीय गृह सचिवांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, सरकारला अपेक्षा आहे की, १३ ऑगस्ट रोजी सुमारे ३० कोटी घरांमध्ये तिरंगा फडकवला जाईल.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत