राष्ट्रीय

Video : त्याने हात जोडले, कान पकडले अन् देवीची मूर्ती उचलून निघून गेला; मंदिरातील चोरीची घटना कॅमेऱ्यात कैद

सीसीटीव्ही फुटेज समोर येताच ही घटना वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. यानंतर मेरठ पोलिसांनी तात्काळ मूर्ती चोराचा शोध घेत त्याच्या मुसक्या आवळल्या.

Rakesh Mali

उत्तर प्रदेशच्या मेरठमधील एका स्थानिक मंदिरात चोरीचा एक विचित्र प्रकार उघडकीस आला आहे. यात चोरी करणारी व्यक्ती मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मेरठमधील सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बालमुखी माता मंदिरात ही घटना घडली. या चोराने ज्या पद्धतीने चोरी केली त्यामुळे सर्वजण थक्क झाले आहेत.

पुजारी प्रदीप गोस्वामी सकाळी मंदिरात गेले, त्यावेळी त्यांना दुर्गामातेची अष्टधातुची मूर्ती न दिसल्याने धक्काच बसला. त्यांनी तात्काळ इतरांना याची कल्पना दिली. यानंतर मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. यात एका व्यक्तीने दर्शनाच्या बहाण्याने येत देवीची मूर्ती चोरल्याचे समजले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हिडिओत एक तरुण मंदिरात पुजा करताना, तसेच हात जोडून उभा असलेला दिसत आहे. यानंतर तो तरुण कान पकडताना दिसतो, जणू काही तो चोरी करण्यापूर्वी देवीची परवानगी घेत होता किंवा माफी मागत होता. यानंतर तो पद्धतशीरपणे देवीची अष्टधातूची मूर्ती चोरुन आपल्या जॅकेटमध्ये लपवतो आणि तेथून पोबारा करतो.

सीसीटीव्ही फुटेज समोर येताच ही घटना वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. यानंतर मेरठ पोलिसांनी तात्काळ मूर्ती चोराचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी आपल्या तपासाची सूत्रे फिरवत मूर्ती चोराच्या मुसक्या आवळल्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने मंदिरात चोरी केली. या प्रकरणी सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपीची ओळख पटल्यानंतर त्यांच्याकडून देवीची मूर्ती ताब्यात घेण्यात आली असून त्याच्यावर पुढील कारवाई केली जात आहे.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश