राष्ट्रीय

ऐकावे ते नवलंच! चोरट्यांनी पळवला टॉमॅटोंनी भरलेला ट्रक, कुठे घडली घटना?

त्यामुळे टोमॅटो वाचवण्यासाठी लोकांकडून वेगवेगळ्या युक्त्यांचा अवलंब केला जात आहे. तथापी चोर देखील वेगवेगळ्या मार्गाने टोमॅटोची चोरी करत आहे

नवशक्ती Web Desk

देशभरात टॉमॅटोचे दर वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. याच पार्श्वभूमिवर टोमॅटोवर वेगवेगळे मीम शेअर होतं आहेत. यावरुन जोक देखील व्हायरल होतं आहेत.
टॉमॅटोचे दर वाढलेल्याने त्यांची चोरी होण्याची देखील शक्यता वाढली आहे. त्यामुळे टोमॅटो वाचवण्यासाठी लोकांकडून वेगवेगळ्या युक्त्यांचा अवलंब केला जात आहे. तथापी चोर देखील वेगवेगळ्या मार्गाने टोमॅटोची चोरी करत आहे. दोन दिवसापूर्वी उत्तर प्रदेशातील टॉमॅटोच्या एका दुकानावर बॉन्सर तैनात करण्यात आले होते.

आता बेंगळुरुमध्ये काही चोरट्यांनी टॉमॅटोचा ट्रक लुटला आहे. मात्र, आढवड्याभरापूर्वी कर्नाटकातूनही याच प्रकराची बातमी समोर आली होती. बेंगळुरुजवळीत चिक्काजाला रोड रेंजच्या नावाखाली तीन लोकांच्या टोळीने टोमॅटोने भरलेल्या ट्रकचा पाठलाग करत तो थांबवला. त्यानंतर त्यांनी तो ट्रक घेऊन पळ काढला.. या ट्रकमध्ये सुमारे अडीच ट्रक टॉमॅटो भरला होता. सध्या टॉमॅटोचे दर गगनाला भिडले असून १०० ते १५० रुपये किलोने टॉमॅटोची विक्री होत आहे.

प्राप्त माहितीनुसार चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरीयुर येथील मल्लेश हा शेतकरी शनिवारी कोलार येथे टोमॅटो घेऊन जात होते.. यावेळी टॉमॅटोने भरलेल्या ट्रकने आरोपी ज्या कारमधून प्रवास करत होते. त्या कारला धडक दिली. यानंतर आरोपींनी ट्रकचालक आणि शेकऱ्याशी गैरवर्त केलं. तसंच भरपाईच्या नावाखाली मोठी रक्कम मागितली. यावेळी शेतकऱ्याकडे पैसे नसल्याने त्याने आरोपींशी बोलणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी शेतकऱ्यांचे काहीही न ऐकता त्याचा ट्रक लुटला. प्रथम आरोपीने जबरदस्ती ट्रक चालवण्यास सुरुवात केली आणि नंतर चालक आणि शेतकऱ्याला ढकलून देत तो टॉमॅटोने भरलेला ट्रक घेऊन पसार झाला.

शेतकऱ्याच्या सांगण्यावरुन ट्रकमध्ये सुमारे अडीच टन टॉमॅटो होते. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवली असून या प्रकरणाचा तपास सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक