राष्ट्रीय

'या' कुस्तीपटूचा समान नागरी कायद्याला जाहीर पाठिंबा ; ट्विट करत म्हणाला...

काँग्रेसचा मात्र, २०२४च्या लोकसभा निवडणुकांआधी समान नागरी कायदा विधेयक आणण्यास विरोध

नवशक्ती Web Desk

भारताच्या राजकारणात समान नागरी कायदा सध्या चर्चेचा विषय आहे. भाजप हे बील आणण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकारने आधी ३७० कलम हटवले, त्यानंतर राम मंदिर देखील २०२४पर्यंत पुर्ण होणार आहे. त्यानंतर आता केंद्रातील भाजप सरकार समान नागरी कायद्याचं विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे समान नागरी कायद्याच्या समर्थनार्थ कुस्तीपटू मैदानात उतरला आहे. ऑलिम्पिक पदक विजेत्या कुस्तीपटूने यासंदर्भातील ट्विट केलं आहे.

हा कुस्तीपटू दुसरा तिसरा कोणी नसून ऑलिम्पिक पदक विजेता योगेश्वर दत्त हा आहे. योगेश्वर दत्त हा भाजपशी जोडला गेला असून त्याने मी समान नागरी कायद्याला समर्थ देत असल्याचं ट्विट केलं आहे. एक भूमी, एक राष्ट्र, आणि एक भारत तुम्ही देखील याला पाठिंबा द्या, असं योगेश्वर दत्तने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

प्राप्त माहितीनुसार केंद्र सरकार जुलै महिन्यात होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. समान नागरी कायदा लागू झाला तर देशातील प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तीसाठी एक कायदा असेल. तसंच सर्वांना लग्न, घटस्फोट, किंवा जमीन- संपत्तीच्या वाट्याबाबत देखील एकच कायदा लागू होईल. असं सांगितलं जात आहे. या कायद्याचा मसुदा तयार झाल्यानंतर त्याच्यावर १९ लाख लोकांना आपली मते नोंदवली आहेत. तर काँग्रेसने मात्र, २०२४च्या लोकसभा निवडणुकांआधी समान नागरी कायदा विधेयक आणण्यास विरोध दर्शवला आहे.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

सावत्र भावांना बहिणींनी जोडा दाखवला - मुख्यमंत्री

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

तुष्टीकरणाला उत्तर कसे द्यायचे हे महाराष्ट्राने दाखवले - मोदी