राष्ट्रीय

आज देशाला मिळणार १५वे राष्ट्रपती;राष्ट्रपतीपदासाठी ९९ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान

राष्ट्रपतीपदी विराजमान होण्याकरिता कोणत्याही उमेदवाराला पाच लाख ४३ हजार २१६ मतांचा आकडा गाठावा लागणार

वृत्तसंस्था

देशाला गुरुवारी १५वे राष्ट्रपती मिळणार आहेत. राष्ट्रपतीपदासाठी सोमवारी निवडणूक पार पडली. एनडीएकडून द्रौपदी मुर्मू, तर संयुक्त पुरोगामी आघाडीकडून यशवंत सिन्हा यांच्यात राष्ट्रपतीपदासाठी चुरस आहे. गुरुवारी सकाळी ११ वाजल्यापासूनच मतमोजणीला सुरुवात होणार असून, देशातील वेगवेगळ्या राज्यांतून मतपेट्या दिल्लीत पोहोचल्या आहेत. राष्ट्रपतीपदासाठी ९९ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाल्यामुळे द्रौपदी मुर्मू यांचे पारडे जड मानले जात आहे. द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्यास, देशातील सर्वोच्च पदावर पोहोचणाऱ्या त्या पहिल्या आदिवासी महिला ठरतील. शिवाय, सर्वात कमी वयाच्या राष्ट्रपती म्हणूनही त्यांचे नाव नोंदले जाईल.

राष्ट्रपतीपदी विराजमान होण्याकरिता कोणत्याही उमेदवाराला पाच लाख ४३ हजार २१६ मतांचा आकडा गाठावा लागणार आहे. त्यातच केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपकडे पाच लाख ३३ हजार ७५१ इतके मताधिक्य आहे, तर विरोधी पक्षाकडे फक्त तीन लाख ६० हजार ३६२ इतके मताधिक्य आहे. त्यातच द्रौपदी मुर्मू यांना ओडिसातील बिजू जनता दल, पंजाबचे अकाली दल, मायावतींची बहुजन समाज पार्टी, तसेच तेलुगू देसम पार्टी, वायएसआर काँग्रेस यांचा पाठिंबा मिळालेला असून, शिवसेनेच्या खासदारांनीही त्यांनाच मतदान केले आहे. तसेच क्रॉस व्होटिंग झाल्याचा दावाही काही मतदारांनी केला आहे.

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन

Mumbai : लालबागचा राजाच्या विसर्जनाला विलंब? तराफ्यावर मूर्ती चढवताना अडचणी

Maharashtra : बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; राज्यात ७ जणांचा मृत्यू

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड; गोंधळ माजवण्यासाठी पाठवला संदेश

चौकशीची मागणी माझी वैयक्तिक! अंजना कृष्णा धमकीप्रकरणी मिटकरी यांचे घूमजाव