TVS चा झेटीई टेलिकॉमबरोबरचा कर्ज वाद मिटला; NCLAT मधील दिवाळखोरीची याचिका मागे घेतली 
राष्ट्रीय

TVS चा झेटीई टेलिकॉमबरोबरचा कर्ज वाद मिटला; NCLAT मधील दिवाळखोरीची याचिका मागे घेतली

टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशन्सने झेडटीई टेलिकाॅम इंडियासोबतचा कर्जाशी संबंधित वाद मिटवला असून, या कंपनीविरुद्धची दिवाळखोरी प्रक्रिया नाकारणाऱ्या आदेशाविरोधात एनसीएलएटीमध्ये दाखल केलेले अपील मागे घेतले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशन्सने झेडटीई टेलिकाॅम इंडियासोबतचा कर्जाशी संबंधित वाद मिटवला असून, या कंपनीविरुद्धची दिवाळखोरी प्रक्रिया नाकारणाऱ्या आदेशाविरोधात एनसीएलएटीमध्ये दाखल केलेले अपील मागे घेतले आहे.

आठवड्याच्या सुरुवातीला, टीव्हीएस सप्लाय चेनच्या वकिलांनी 'राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरणा'ला या तडजोडीबाबत माहिती दिली आणि अपील मागे घेण्याची विनंती केली.

अध्यक्ष न्यायमूर्ती अशोक भूषण आणि सदस्य (तांत्रिक) वरुण मित्रा यांचा समावेश असलेल्या न्यायाधिकरणाच्या दोन सदस्यीय खंडपीठाने ही याचिका मागे घेण्यास परवानगी दिली.

अपीलकर्त्याचे (टीव्हीएस) वकील असे नमूद करतात की, संबंधित पक्षांमध्ये हा वाद मिटला आहे आणि त्यांना हे अपील मागे घेण्याची परवानगी दिली जावी. ही परवानगी मंजूर करण्यात येत आहे, असे न्यायाधिकरणाने म्हटले आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये, 'राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या (एनसीएलटी) चंदीगड येथील खंडपीठाने, संबंधित पक्षांमध्ये आधीपासूनच वाद अस्तित्वात असल्याचे निरीक्षण नोंदवत टीव्हीएसने दाखल केलेली दिवाळखोरीची याचिका फेटाळून लावली होती. एनसीएलटीने आदेशात म्हटले होते की, टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशन्सने दावा केलेले कर्ज हे वादग्रस्त होते.

मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरण : गँगस्टर अबू सालेमच्या मुदतपूर्व सुटकेची याचिका फेटाळली; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Mumbai : राडारोडा वाहतूक करणाऱ्या वाहनांना नोंदणी अनिवार्य; २३ सप्टेंबरपर्यंत नोंदणीची मुदत

Thane : लोकलमधून महिला प्रवासी खाली पडली; दिवा-मुंब्रा वळणावरील Video व्हायरल

AI 80s Photo Trend : राजकीय नेत्यांनाही एआय ट्रेंडची भुरळ; १९८० च्या दशकातील रेट्रो लूक सोशल मीडियावर व्हायरल

ठाणे कोस्टल रोड-१च्या कामाला वेग; १४ महिन्यांत ४० टक्के काम पूर्ण