Mumbai : तुर्की बनावटीची पिस्तूल जाम झाल्याने टायगर बचावला; गोळीबार तपास प्रकरणात माहिती उघड

जमनाबाई नरसी इंटरनॅशनल स्कूलच्या क्रीडांगणाच्या प्रवेशद्वाराजवळ लॉरेन्स बिश्नोई गँगच्या सदस्यांनी केलेल्या गोळीबारादरम्यान तुर्की बनावटीची 'झिगाना' पिस्तूल जाम झाल्यामुळे अभिनेता टायगर श्रॉफ १८ ऑक्टोबरला एका संभाव्य प्राणघातक हल्ल्यातून थोडक्यात बचावला.
Mumbai : तुर्की बनावटीची पिस्तूल जाम झाल्याने टायगर बचावला; गोळीबार तपास प्रकरणात माहिती उघड
Mumbai : तुर्की बनावटीची पिस्तूल जाम झाल्याने टायगर बचावला; गोळीबार तपास प्रकरणात माहिती उघड
Published on: 

पूनम अपराज/मुंबई

जमनाबाई नरसी इंटरनॅशनल स्कूलच्या क्रीडांगणाच्या प्रवेशद्वाराजवळ लॉरेन्स बिश्नोई गँगच्या सदस्यांनी केलेल्या गोळीबारादरम्यान तुर्की बनावटीची 'झिगाना' पिस्तूल जाम झाल्यामुळे अभिनेता टायगर श्रॉफ १८ ऑक्टोबरला एका संभाव्य प्राणघातक हल्ल्यातून थोडक्यात बचावला. अभिनेता त्याच्या बीएमडब्ल्यू कारमधून परतत असताना शूटर्सनी त्याच्यावर गोळीबार केला होता.

Mumbai : तुर्की बनावटीची पिस्तूल जाम झाल्याने टायगर बचावला; गोळीबार तपास प्रकरणात माहिती उघड
Tiger Shroff Firing : तिन्ही आरोपींना ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी, दिल्ली-हरियाणातून आणखी ५ जण अटकेत
Mumbai : तुर्की बनावटीची पिस्तूल जाम झाल्याने टायगर बचावला; गोळीबार तपास प्रकरणात माहिती उघड
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण : आणखी एका आरोपीला इंदूरमधून अटक

रेहान आणि फूल सिंह या शूटर्सनी टायगरच्या कारवर गोळीबार केला. रेहानकडे तुर्की बनावटीची झिगाना पिस्तूल होती, तर फूल सिंहकडे देशी कट्टा होता. सिंहने कट्ट्यातून ५ राऊंड फायर केले. पळून जात असताना रेहानने झिगाना पिस्तूलमधून आणखी दोन राऊंड झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही राऊंड फायर होऊ शकले नाहीत व काडतुसे फायर न होताच खाली पडली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in