राष्ट्रीय

ट्विटरच्या व्यवहाराला समभागधारांनी दिली मंजुरी

ट्विटर कंपनीच्या सॅन फ्रान्सिस्को मुख्यालयात गुंतवणूकदारांसोबत बुधवारी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला

वृत्तसंस्था

सोशल मीडिया असलेल्या ट्विटरच्या शेअरहोल्डर्सनी १३ सप्टेंबरला ४४ अब्ज डॉलरच्या (सुमारे ३.५० लाख कोटी रुपये) विक्री कराराला मंजुरी दिली आहे. ट्विटरच्या बहुतांश भागधारकांनी प्रति शेअर ५४.२० डॉलरच्या खरेदी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. ट्विटर कंपनीच्या सॅन फ्रान्सिस्को मुख्यालयात गुंतवणूकदारांसोबत बुधवारी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

कंपनीने हा करार अब्जाधीश  इलॉन मस्क यांच्यासोबत केला आहे. मात्र, स्पॅम खात्यावरील चुकीच्या माहितीचा हवाला देत मस्कने हा करार रद्द केला होता. अशा परिस्थितीत ट्विटरने याबाबत न्यायालयात धाव घेतली. अमेरिकेच्या डेलावेअर न्यायालयात १७ ऑक्टोबरपासून सुनावणी सुरु होणार आहे. यात मस्क यांनी ट्विटर खरेदी करायचे की नाही, याचा निर्णय होणार आहे.

मस्क यांनी करार रद्द केल्याच्या विरोधात ट्विटर कोर्टात पोहोचले आहे. अमेरिकेच्या डेलावेअर न्यायालयात १७ ऑक्टोबरपासून सुनावणी सुरू होणार आहे. आता त्यांनी हा करार पूर्ण करावा अशी ट्विटरची मागणी आहे. अशा परिस्थितीत आता न्यायालयातच या प्रकरणी काही तोडगा निघू शकतो, असे जाणकारांचे मत आहे.

भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतले; चारही अंतराळवीरांसह कॅलिफोर्नियातील समुद्रात लँडिंग,भारतासाठी अभिमानाचा क्षण

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

अखेर जयंत पाटलांचा राजीनामा; शशिकांत शिंदेंकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा

आता मेट्रो गर्दीचे आव्हान