राष्ट्रीय

मणिपूरमध्ये दोन बिहारी मजुरांची हत्या; एक अतिरेकी ठार, ६ दहशतवाद्यांना अटक

मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळला असून, शनिवारी संध्याकाळी काकचिंगमध्ये दहशतवाद्यांनी दोन मजुरांची गोळ्या झाडून हत्या केली. दोन्ही मजूर बिहारच्या गोपालगंज येथील रहिवासी होते.

Swapnil S

इंफाळ : मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळला असून, शनिवारी संध्याकाळी काकचिंगमध्ये दहशतवाद्यांनी दोन मजुरांची गोळ्या झाडून हत्या केली. दोन्ही मजूर बिहारच्या गोपालगंज येथील रहिवासी होते. दऱम्यान, मणिपूरच्या थौबलमध्ये एका अतिरेकी गटाची पोलिसांशी झालेल्या चकमकीत एका अतिरेक्याचा मृत्यू झाला, तर पोलिसांनी ६ दहशतवाद्यांना अटक केली.

शनिवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास काकचिंग-वाबगाई रोडवरील केरक येथील पंचायत कार्यालयाजवळ काम आटोपून सदर दोन मजूर सायकलवरून घरी परतत असताना त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी दोन्ही मजुरांना रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. सुनालाल कुमार (१८) आणि दशरथ कुमार (१७) अशी या मजुरांची नावे आहेत, ते गोपालगंजमधील राजवाही गावचे रहिवासी आहेत.

दुसरीकडे, मणिपूरच्या थौबलमध्ये एका अतिरेकी गटाची पोलिसांशी चकमक झडली. यामध्ये एका अतिरेक्याचा मृत्यू झाला, तर पोलिसांनी ६ दहशतवाद्यांना q संमिश्र पानावर

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन

Mumbai : लालबागचा राजाच्या विसर्जनाला विलंब? तराफ्यावर मूर्ती चढवताना अडचणी

Maharashtra : बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; राज्यात ७ जणांचा मृत्यू

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड; गोंधळ माजवण्यासाठी पाठवला संदेश

चौकशीची मागणी माझी वैयक्तिक! अंजना कृष्णा धमकीप्रकरणी मिटकरी यांचे घूमजाव