कार्यकाळ संपल्याने केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांचा राजीनामा (Photo-X/@PBSHABD)
राष्ट्रीय

कार्यकाळ संपल्याने केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांचा राजीनामा

केंद्रीय मंत्री आणि केरळमधील भाजपचे ज्येष्ठ नेते जॉर्ज कुरियन यांनी मंगळवारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री आणि केरळमधील भाजपचे ज्येष्ठ नेते जॉर्ज कुरियन यांनी मंगळवारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. जॉर्ज कुरियन यांचा राज्यसभेतील कार्यकाळ २१ जून रोजी संपला. भाजपने त्यांना नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत पुन्हा उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला होता.

जॉर्ज कुरियन हे केंद्रीय अल्पसंख्यांक व्यवहार राज्यमंत्री आणि मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय राज्यमंत्री म्हणून कार्यरत होते. राष्ट्रपती भवनातून जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कुरियन यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

ऑगस्ट २०२४ मध्ये, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी रिक्त केलेल्या जागेवर ते मध्य प्रदेशातून राज्यसभेवर बिनविरोध निवडून आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसार, राष्ट्रपतींनी भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ७५ (२) अंतर्गत जॉर्ज कुरियन यांचा राजीनामा तत्काळ प्रभावाने स्वीकारला आहे.

Mumbai : चार हॉटेल्सवर एफडीएची कारवाई; कॅफे मोंडेगर, महाराष्ट्र बिर्याणी सेंटरचे परवाने निलंबित

Mumbai Ganeshotsav 2026 : बाप्पासाठी चक्क रेल्वे; मूषक झाले प्रवासी, सोशल मीडियावर Video व्हायरल

PMLA प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; ED कडून प्रकरणांचा तपशील मागवला

Ganeshotsav 2026 : गणपती दर्शनाला ठाण्यात जाताय? 'या' मंडळांना नक्की भेट द्या

ठाण्यात आस्थापनांची परवाना नूतनीकरणाकडे पाठ; परवाना विभागाकडून मागील १८ महिन्यांत १,१८२ नोटिसा, अवघ्या ४३४ चे नूतनीकरण