नवी दिल्ली : स्वतः ज्या खात्याचे मंत्री आहेत त्याच मंत्र्यांनी स्वतःच्या सहीनेच स्वतःच्याच एका प्रकल्पासाठी स्वतःच्याच मंत्रालयाकडून ९९ लाख रुपयांचे अनुदान घेण्याचा प्रकार घडला असून सध्या त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री भगीरथ चौधरी यांना त्यांच्याच मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत त्यांच्याच काकडी शेती प्रकल्पासाठी ९९.०३ लाख रुपयांचे अनुदान देण्याचा आरोप करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मात्र संपूर्ण प्रक्रिया नियमांनुसारच पार पडली असून, विचारल्यास सर्व कागदपत्रे सादर करण्यास मी तयार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
तीन महिन्यांपूर्वी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत चौधरींना ९९ लाख रुपयांचे अनुदान मिळाले. ज्या नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डाच्या माध्यमातून हा प्रकल्प मंजूर झाला.