राष्ट्रीय

सीटबेल्टसक्ती, हेल्मेट सक्ती तुम्हाला नकोशी वाटतेय? मग ही आकडेवारी बघाच...

प्रतिनिधी

गेल्या काही वर्षांमध्ये कार अपघाताची संख्या वाढली असून त्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची आकडेवारी ही सावध करणारी आहे. नुकतेच प्रसिद्ध उद्योजक सायरस मिस्त्री यांचादेखील कार अपघातात मृत्यू झाला. यानंतर देशभरामध्ये सीट बेल्टचा वापर करण्याबाबत जनजागृती करण्यात आली. केंद्र सरकरने सीटबेल्ट बाबत काही कठोर पण महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी केंद्र सरकारने अनेक पाऊले उचलली आहेत. अशामध्ये एका अहवालानुसार, गेल्या वर्षी झालेल्या कार अपघातांमध्ये १० पैकी ८ प्रवाशांचा मृत्यू हा सीटबेल्ट न लावल्यामुळे झाला आहे. तसेच, रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या ३ पैकी २ जणांनी हेल्मेटचा वापर न केल्याचे आढळून आले.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अहवालानुसार, गेल्या वर्षी झालेल्या अपघातांमध्ये सीट बेल्टचा वापर न केल्याने झालेल्या मृत्यूंची संख्या ही उत्तर प्रदेशमध्ये अधिक आहे. उत्तर प्रदेशमध्ये तब्बल ३८६३ जणांचा मृत्यू हा सीटबेल्टचा वापर न केल्यामुळे झाला आहे. तर, देशामध्ये तब्बल ८३ टक्के प्रवाशांचा मृत्यू हा सीटबेल्ट न लावल्यामुळे झाला आहे. ही आकडेवारी धक्कादायक असून विचार करायला भाग पडणारी आहे. तसेच, दुचाकीच्या झालेल्या अपघातांमध्ये ६९,३८५ दुचाकीस्वारांपैकी अंदाजे ४७,००० लोकांनी हेल्मेटचा वापर केला नव्हता. ही आकडेवारी पाहता दुचाकी आणि चारचाकीमध्ये सुरक्षा किती महत्त्वाची आहे ? आणि सीटबेल्ट सक्ती आणि हेल्मेट सक्ती का आहे? याचे उत्तरही मिळते.

राज्य सरकारच्या धर्तीवर ‘ड्युटी पॅटर्न’ राबवा; परिचारिकांच्या शेकडो रिक्त पदांमुळे कामाचा ताण

"उद्धव ठाकरेंना १९९९मध्ये मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पडू लागली होती म्हणून...", देवेंद्र फडणवीस यांचा दावा

चेन्नईसाठी करो या मरो; प्ले-ऑफमधील प्रवेशासाठी राजस्थान रॉयल्सविरुद्ध विजय आवश्यक

ज्योतिषानं काढली भाजप-काँग्रेसची कुंडली अन् थेट सांगितला लोकसभेचा निकाल; नेटकरी घेतायेत मजा

मोदींनंतर अमित शहा पंतप्रधान! मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा दावा