राष्ट्रीय

"बूट फाटल्यामुळे मेहुण्याच्या लग्नाला मुकलो", दुकानदाराला पाठवली कायदेशीर नोटीस

हे शूज एका नामांकित ब्रँडचे असून त्याची सहा महिन्यांची वॉरंटी आहे, असे दुकानदाराने सांगितले होते. तथापि, शूज सहा दिवसांतच फाटले. नुकसान भरपाई न दिल्यास....

Swapnil S

उत्तर प्रदेशातील एका अनोख्या घटनेची चर्चा आहे. येथील फतेहपूर जिल्ह्यातील एका व्यक्तीने दुकानातून खरेदी केलेले बूट फाटल्यामुळे थेट दुकानदाराला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. फाटलेल्या शूजमुळे मेहुण्याच्या लग्नाला उपस्थित राहता आले नाही, असा दावा ज्ञानेंद्र भान त्रिपाठी यांनी नोटीसमध्ये केला आहे.

यामुळे मानसिक त्रास झाला आणि कानपूर येथील रुग्णालयात उपचार घ्यावे लागले, असाही दावा पेशाने वकील असलेल्या त्रिपाठी यांनी केला आहे. त्यांनी गेल्या वर्षी 21 नोव्हेंबर रोजी सलमान हुसैन यांच्या दुकानातून शूज खरेदी केले होते. हे शूज एका नामांकित ब्रँडचे असून त्याची सहा महिन्यांची वॉरंटी आहे, असे दुकानदाराने सांगितले होते. तथापि, शूज सहा दिवसांतच फाटले. याच कारणामुळे आपल्या मेहुण्याच्या लग्नाला मुकावे लागले, असे त्रिपाठी यांनी म्हटले आहे.

नुकसान भरपाई न दिल्यास गुन्हा दाखल करणार

यामुळे मानसिक त्रास झाला आणि त्यासाठी खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागल्याचा दावा त्रिपाठी यांनी केला. त्यासाठी त्यांनी 19 जानेवारी रोजी दुकानदाराला नोटीस पाठवून उपचारासाठी खर्च केलेले 10,000 रुपये, नोंदणीसाठी 2,100 रुपये आणि खरेदी केलेल्या शूजसाठी 1,200 रुपये मागितले. नुकसान भरपाई न दिल्यास दुकानदारावर गुन्हा दाखल करण्याची धमकीही त्रिपाठी यांनी दिली.

दुकानदार म्हणतो 50 टक्के डिस्काउंट दिले होते

प्रत्युत्तरात दुकानदार सलमान हुसैन यांनी त्रिपाठी यांनी त्यांच्या दुकानातून शूज खरेदी केल्याचे मान्य केले. तथापि, शूज नामांकित ब्रँडचे असल्याचे खोटे बोलल्याचा दावा त्याने फेटाळून लावला. त्रिपाठी यांनी 50 टक्के सूट देऊन शूज खरेदी केल्याचेही हुसैन यांनी सांगितले. "सहा महिन्यांत बुटाचे सोल खराब होणार नाही अशी हमी देण्यात आली होती, पण काहीही झाले नाही. ते माझ्यावर बळजबरीने दबाव आणत आहेत आणि त्यांचे सर्व आरोप निराधार आहेत," असेही हुसैन यांनी सांगितले.

नवी मुंबई विमानतळ नेटवर्क वाद : NMIAL वर आरोप, TRAI अ‍ॅक्शन मोडमध्ये; टेलिकॉम दरांची तपासणी सुरू

२९ पैकी १५ ठिकाणी महिला महापौर; महानगरपालिकांसाठी महापौरपदाची आरक्षण सोडत जाहीर, बघा लिस्ट

ग्रीनलँड वाद शमण्याची चिन्हे! ट्रम्प यांचा यू-टर्न; युरोपियन देशांवर टॅरिफची धमकी मागे घेतली, बळाचा वापर करणार नसल्याचंही केलं स्पष्ट

Republic Day Alert: '२६-२६' कोडमुळे देशभरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क; गुप्तचर यंत्रणेकडून दहशतवादी हल्ल्याचा इशारा

शिंदेसेनेला मिळू शकते एक वर्षासाठी महापौरपद; बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या मुद्यावर ठाकरे बंधूंना दणका देण्याची भाजपची नवी खेळी