राष्ट्रीय

गहू चोरल्याच्या आरोपावरून तीन दलित मुलांचे मुंडण करून गावातून काढली धिंड; तिघांना अटक, एकजण फरार

पाच किलो गहू चोरल्याच्या आरोपावरून पोल्ट्री फार्मच्या दोघा मालकांनी तीन दलित मुलांचे मुंडण करून आणि त्यांच्या तोंडाला काळे फासून त्यांची धिंड काढल्याचा प्रकार

Swapnil S

बहराइच : पाच किलो गहू चोरल्याच्या आरोपावरून पोल्ट्री फार्मच्या दोघा मालकांनी तीन दलित मुलांचे मुंडण करून आणि त्यांच्या तोंडाला काळे फासून त्यांची धिंड काढल्याचा प्रकार येथील एका गावात घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

सदर तीन मुले कामावर हजर न झाल्याने दोघा पोल्ट्री मालकांनी त्यांचा छळ केला, असा आरोप पीडित मुलांच्या कुटुंबीयांनी केला आहे. ताजपुर तेडिया गावात हा प्रकार घडला. दोघा मालकांनी १२-१४ वर्षे वयोगटातील मुलांचे मुंडण केले, त्यांच्या तोंडाला काळे फासले, त्यांच्या हातावर चोर असे लिहिले आणि हात बांधून गावात त्यांची धिंड काढली, असे पोलिसांनी सांगितले.

पीडित मुलांच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीवरून नझीम खान, कासम खान, इनायत आणि सानू या चार आरोपींविरुद्ध बुधवारी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सानू हा फरार झाला असून अन्य तिघांना अटक करण्यात आली आहे.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश