राष्ट्रीय

उत्तर प्रदेश हादरलं! न्यायालयाच्या परिसरातच कुख्यात गुन्हेगार संजीव जीवाची गोळ्या झाडून हत्या

विशेष म्हणजे ही हत्या देखील अतिक आणि अशरफ यांच्या हत्येप्रमाणं पोलिसांच्या गराड्यात करण्यात आली आहे.

नवशक्ती Web Desk

उत्तर प्रदेशात काही दिवसांपुर्वी कुख्यात गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. आता उत्तर प्रदेश आणखी एका गुन्हेगाराच्या हत्येनं हादरून निघालं आहे. विशेष म्हणजे ही हत्या देखील अतिक आणि अशरफ यांच्या हत्येप्रमाणं पोलिसांच्या गराड्यात करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊ शहरात न्यायालयाच्या परिसरात ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेत गुन्हेगारासह इतर दोन जणांना देखील गोळ्या लागल्या असून त्यात एका मुलीचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे.

संजीव माहेश्वरी उर्फ जीवा असं हत्या झालेल्या आरोपीचं नाव आहे. लखनऊच्या न्यायालय परिसरात वकिलाच्या वेशात येऊन हल्लेखोराने गोळ्या झाडून जीवाची हत्या केली आहे. यावेळी हल्लेखोराला घटनास्थळीचं अटक करण्यात आली. या घटनेनंतर वकिलांनी संतप्त होत दगडफेक केली असल्याने त्यात काही पोलीस जखमी झाले आहेत. संजीव जीवा हा मुन्ना बजरंगी गँग आणि मुख्तार अन्सारी गँगशी संबंधित होता. भाजपचे आमदार कृष्णानंद राय यांच्या हत्येत त्याचं नाव आलं होतं. मात्र त्याची निर्दोष मुक्तता झाली होती. संजीव जीवाची पश्चिम उत्तर प्रदेशात मोठी दहशत होती. सध्या तो लखनऊच्या कारागृहात होता. एका खटल्यासाठी त्याला न्यायालयात नेण्यात आलं होतं. याच वेळी त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मुन्ना बजरंगीच्या हत्येनंतर जीवाने आपल्या हत्येची भीती व्यक्त केली होती.

भाजपचे माजी मंत्री ब्रम्हदत्त द्वेदी यांची 10 फेब्रुवारी 1997 रोजी लोहाई रोडवर गोळी मारुन हत्या करण्यात आली होती. या हत्येत देखील जीवाचा हात होता. याप्रकरणी सीबीआय न्यायालयाने 17 जूलै 2023 रोजी माजी आमदार विजय सिंह आणि संजीव माहेश्वरी उर्फ जीवा यांना आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली होती. जीवाच्या पत्नीने 2021 साली सुप्रिम कोर्टाच्या सरन्याधीशांना पतीच्या हत्येच्या कटाची शंका उपस्थित करत त्याच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली होती.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश