वेदांता समूहावर 'ईडी'ची छापेमारी X
राष्ट्रीय

वेदांता समूहावर 'ईडी'ची छापेमारी

परकीय चलनाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) उद्योगपती अनिल अगरवाल यांच्या वेदांत समूहाविरोधात सोमवारपासून छापे टाकण्यात आले आहेत. यात दिल्ली, मुंबई आणि राजस्थानमधील उदयपूर येथील कार्यालयांसह ‘वेदांता लिमिटेड’ च्या चार ठिकाणांची झडती घेण्यात आली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Swapnil S

नवी दिल्ली : परकीय चलनाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) उद्योगपती अनिल अगरवाल यांच्या वेदांत समूहाविरोधात सोमवारपासून छापे टाकण्यात आले आहेत. यात दिल्ली, मुंबई आणि राजस्थानमधील उदयपूर येथील कार्यालयांसह ‘वेदांता लिमिटेड’ च्या चार ठिकाणांची झडती घेण्यात आली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

हा तपास परकीय चलन व्यवस्थापन कायद्याच्या (फेमा) तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी करण्यात आला. लंडनस्थित मूळ कंपनी ‘वेदांता रिसोर्सेस’ने २०२३ मध्ये भारतीय कंपनी ‘वेदांता लिमिटेड’ला ब्रँड फीचा काही भाग परत केला होता. हे प्रकरण सध्या या केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या समूहाच्या इतर काही आर्थिक संरचनांचीही तपासात चौकशी केली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

‘वेदांता’च्या प्रवक्त्याने ईडीच्या कारवाईला दुजोरा दिला असून, कंपनी ‘अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत आहे आणि मागितलेली सर्व माहिती पुरवत आहे. कंपनी सर्व लागू कायदे आणि नियमांचे पालन करण्यास कटिबद्ध आहे. हे प्रकरण सध्या नियामक प्रक्रियेत असल्याने, आम्ही या टप्प्यावर अधिक भाष्य करू शकत नाही, असे त्याने सांगितले.

कंपनीच्या संचालक मंडळाने नुकतीच वेदांता कंपन्यांच्या विभाजनाला मंजुरी दिली आहे. याअंतर्गत चार वेगवेगळ्या कंपन्या शेअर बाजारात सूचिबद्ध करण्याची योजना आहे.

Mumbai : उद्या मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री जम्बो ब्लॉक, कोणत्या लोकल रद्द? जाणून घ्या

Mumbai CJP Protest : अभिनेता इम्रान खान पोलिसांच्या ताब्यात; व्हॅनमधून फोटो शेअर करत म्हणाला...

CJP Protest : आंदोलनाला हिंसक वळण; अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जींसह अनेक नेते पोलिसांच्या ताब्यात, Video

CJP Protest : अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; जंतर-मंतरवरील आंदोलनाची धुरा आता अजिंक्य शिंदेंकडे, Video

अभिजीत दिपके यांच्या आजीचं निधन; नातू दिल्लीत पोलिसांच्या ताब्यात, अंत्यसंस्कारासाठी गावी परतण्याची शक्यता