राष्ट्रीय

उपराष्ट्रपतीपद निवडणूक अधिसूचना जारी; ९ सप्टेंबरला मतदान

केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी केली. उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट आहे, तर मतदान ९ सप्टेंबरला होणार आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी केली. उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट आहे, तर मतदान ९ सप्टेंबरला होणार आहे. उपराष्ट्रपती जनदीप धनखड यांनी गेल्या महिन्यात राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले आहे. ही १७ वी उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख २५ ऑगस्ट आहे.

‘एनडीए’चा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार मोदी-नड्डा ठरवणार

केंद्रीय संसदीय मंत्री किरण रिजिजू यांनी सांगितले की, ‘एनडीए’चा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार निवडण्याचे अधिकार पंतप्रधान मोदी व भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना देण्यात आले आहेत. रालोआच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

राज्यातील २६५ तालुक्यांत कोरडा दुष्काळ जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

'लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी एकत्र या'; SIR विरोधात ४ ऑक्टोबरला मुंबईत जनमोर्चा, राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

सोनं-दागिने दाखवत बनवायची Reel; चोरट्यांनी VIDEO पाहून साधली संधी, घरातून १ कोटींचा ऐवज लंपास

यवतमाळमध्ये वेल्डिंग करताना भीषण स्फोट; दोघांचा जागीच मृत्यू, ५ जण गंभीर जखमी, Video

नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेक; खिडक्यांच्या काचा फुटल्या, Video व्हायरल