राष्ट्रीय

व्हिएतनामची भारतीय पर्यटकांसाठी मोहीम

अभय जोशी

जगभरातील अनेक देशांची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे. त्यामुळे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना आखल्या जातात. भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी दक्षिण-पूर्व आशियाई देश असलेल्या व्हिएतनामची प्रमुख एअरलाइन कंपनी व्हिएतजेटने पर्यटन खात्यासह पुढाकार घेतला आहे.

भारताचे व्हिएतनाममधील दूतावासातील उपमुख्य अधिकारी सुभाष प्रसाद गुप्ता आणि द नांग टुरिझम असोसिएशनचे चेअरमन काओ ट्राय डंग यांच्या उपस्थितीत नुकत्याच एका सेमिनारमध्ये पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी दीर्घकालीन धोरण जाहीर करण्याची मते मांडण्यात आली. त्यानुसार मध्य व्हिएतनाममधील पोर्ट सिटी असलेल्या द नांग शहरातून व्हिएतजेटने मुंबईसह अहमदाबाद, हैदराबाद, बंगळुरू या शहरांमधून आठवड्यातून चार वेळा विमानसेवा अनुक्रमे ३० सप्टेंबर, ९ ऑक्टोबर आणि २ नोव्हेंबर रोजी थेट विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीच व्हिएतजेटची मुंबईतून आठवड्यातून तीन ते चार विमानसेवा व्हिएतनामच्या हो ची मीन, हुआन आणि हुए या शहरांसाठी सुरू आहे. शिवाय आणखीन दोन विमान कंपन्यांकडूनही विमानसेवा सुरू आहे.

भारतातून जास्तीत जास्त पर्यटकांनी व्हिएतनाममध्ये येऊन पर्यटनाचा आनंद घ्यावा. त्याचबरोबर पर्यटनातून स्थानिकांना रोजगार मिळून अर्थव्यवस्था मजबूत व्हावी, ही सेमिनारमागची संकल्पना आहे, असे ट्रूऑन्ग थी हँग हॅन, डायरेक्टर, द नांग डिपार्टमेंट ऑफ टुरिझम यांनी सांगितले. द नांग हे पर्यटनासाठी प्रसिद्ध असून येथील बा ना हिल्स हे पर्वतीय ठिकाण अवश्य भेट देण्यासारखे आहे. तेथील भव्य गोल्डन ब्रिज अतिभव्य हातांच्या सपोर्टने उभारण्यात आला आहे. या गोल्डन ब्रिजवर जाण्याचा आनंद घेणे, अनेक पर्यटकांचे विशेषत: नवजोडप्यांचे स्वप्न असते. त्यामुळे व्हिएतजेटने द नांगला येणाऱ्या नवविवाहितांसाठी ‘लव्ह कनेक्शन फॉर इंडियन कपल्स’ अशी मोहीम जाहीर केली. येथील समुद्रकिनाऱ्यावरील पांढरी वाळू आणि स्वच्छ नितळ पाणी हे पर्यटकांचे आकर्षण आहे. याशिवाय पुरातन शहरे अवश्य भेट देण्यासारखे आहेत. हू आन हे पुरातन शहर असून दक्षिण पूर्व आशियामध्ये पंधराव्या ते एकोणिसाव्या शतकांत मध्ये बंदर म्हणून नावारुपास आले होते. या शहरातील इमारती आणि रस्ते पाहिले असता देशातील आणि विदेशातील संरचनांचा प्रभाव दिसून येतो. हुए हे शहरही प्रसिद्ध सिटाडेल राजवाडा आणि आयकॉनिक पागोडा यासाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी ९४ हजार भारतीय पर्यटक व्हिएतनामला भेट देतात. या पर्यटकांची वर्गवारी केली असता ७५ टक्के पर्यटक हे ३० ते ५५ या वयोगटातील आहेत.

याशिवाय पर्यटनवाढीसाठी ‘व्हिसा ऑन ॲरिव्हल’ सुरू करणे गरजेचे आहे, असे भारताचे व्हिएतनाममधील अधिकारी गुप्ता यांनी सेमिनारमध्ये सांगितले. याशिवाय पर्यटन वाढीसाठी भारतातील फिल्म इंडस्ट्रीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘ऑफर’ देणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. याशिवाय गुप्ता यांनी, भारतीय पर्यटकांना आकर्षित करायचे असेल, तर भारतीय अन्नपदार्थ व्हिएतनाममध्ये उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे आहे. त्यादृष्टीने हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन यांनी इंडियन फूड उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत. द नांग हॉटेल ॲण्ड रेस्टॉरंट असोसिएशनचे प्रमुख यांनीही व्हिसा ऑन ॲरिव्हल सेवा सुरू व्हावी, असे मत मांडले.

काँग्रेसला मोठा धक्का! अरविंदर सिंग लवली यांचा दिल्लीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा; 'आप'सोबत युती केल्यामुळे नाराज

सरसंघचालक मोहन भागवत यांचे आरक्षणाच्या मुद्यावरून स्पष्टीकरण; "जोपर्यंत आरक्षणाची गरज..."

उज्ज्वल निकम यांना जळगावातून उमेदवारी द्यायला हवी होती - संजय राऊत

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जनतेच्या मनात सहानुभूती - छगन भुजबळ

Loksabha Election 2024 : भाजपने उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांना दिली उमेदवारी; पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया