एक्स @airnews_abad
राष्ट्रीय

विनोद कुमार शुक्ल यांना ज्ञानपीठ पुरस्कार

छत्तीसगडमधील रायपूर येथील हिंदी कवी आणि कथाकार विनोद कुमार शुक्ल यांना या वर्षीचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे.

Swapnil S

रायपूर : छत्तीसगडमधील रायपूर येथील हिंदी कवी आणि कथाकार विनोद कुमार शुक्ल यांना या वर्षीचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. नवी दिल्लीतील ज्ञानपीठ निवड समितीने शनिवारी याबाबतची घोषणा केली. पहिल्यांदाच छत्तीसगडमधील एका लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळणार आहे.

विनोद शुक्ल यांच्या ‘नौकर की कमीज’, ‘इफ इट ब्लूम्स वी विल सी’, ‘देअर युज्ड टू बी अ विंडो इन द वॉल’ या त्यांच्या हिंदी कादंबऱ्या चांगल्याच गाजल्या होत्या. त्यांच्या ‘नौकर की कमीज’ या कादंबरीवर चित्रपट निर्माते मणी कौल यांनी चित्रपटही बनवला होता. विनोद कुमार शुक्ल गजानन माधव मुक्तिबोध फेलोशिप, रझा पुरस्कार, वीरसिंह देव पुरस्कार, सृजनभारती पुरस्कार, रघुवीर सहाय स्मृती पुरस्कार, दयावती मोदी कवी शिखर पुरस्कार, भवानीप्रसाद मिश्र पुरस्कार, मैथिलीशरण गुप्त पुरस्कार, पंडित सुंदरलाल शर्मा पुरस्कार या अशा अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. ‘देअर युज्ड टू बी अ विंडो इन द वॉल’ या कादंबरीसाठी त्यांना १९९९ मध्ये ‘साहित्य अकादमी’ पुरस्कारही मिळाला आहे. गेल्या वर्षी त्यांना पेन अमेरिकेने आंतरराष्ट्रीय स्तरावरील नाबोकोव्ह पुरस्काराने सन्मानित केले. हा सन्मान मिळवणारे ते आशियातील पहिले साहित्यिक आहेत.

राजनांदगाव येथे १ जानेवारी १९३७ रोजी जन्मलेल्या विनोद कुमार शुक्ल यांचा पहिला काव्यसंग्रह ‘अभिषेक जय हिंद’ हा १९७१ मध्ये प्रकाशित झाला. त्यांचे कथासंग्रह ‘रूम ऑन अ ट्री’ आणि ‘कॉलेज’ यांनाही चांगली लोकप्रियता मिळाली होती.

मुंबई : रुग्णालयांतील अन्न निकृष्ट निघाल्यास फक्त ₹१००० दंड; BMC च्या टेंडरमधील अटींवर तज्ज्ञांकडून सवाल

Mumbai : मलबार हिलमधील 'एलिव्हेटेड नेचर ट्रेल' पावसाळ्यात ठरला 'हॉटस्पॉट'; सुमारे ३ लाख पर्यटकांची भेट, BMC च्या खात्यात तब्बल...

...तर झाडे तोडण्याची परवानगी मागे घेऊ! मुंबई मेट्रो, GMLR प्रकल्पावरून सुप्रीम कोर्टाचा महाराष्ट्र सरकारला इशारा

भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यावरून सुप्रीम कोर्टाने सर्व राज्यांना फटकारले; मुख्य सचिवांना हजर राहण्याचे दिले आदेश

त्या 'जीआर'च्या स्थगितीस नकार; ओबीसी संघटनांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली