@PyaraBetaa/X 
राष्ट्रीय

'वडा पाव गर्ल'ला दिल्ली पोलिसांनी केली अटक? रस्त्यावरील हाय-व्होल्टेज ड्रामाचा Video Viral!

Vada Pav Girl Arrested: दिल्लीची प्रसिद्ध वडा पाव गर्ल चंद्रिका गेरा दीक्षित हिचा एक व्हिदैओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तिला दिल्ली पोलिसांनी अटक केल्याचा दावा केला जात आहे.

Tejashree Gaikwad

Vada Pav Girl Chandrika Gera Dixit: गेल्या काही महिन्यांपासून दिल्लीमध्ये वडा पाव गर्ल म्हणून चंद्रिका गेरा दीक्षित ही महिला चर्चेत आहे. आता याच व्हायरल गर्लचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओनुसार चंद्रिका गेरा दीक्षितला दिल्ली पोलिसांनी अटक केल्याचा दावा केला जात आहे. अशीच चर्चा सगळ्या सोशल मीडियावरही होत आहे. चंद्रिकाच्या अटकेच्या वेळी काही लोक अडवणूक करताना दिसत आहेत. लोकांच्या विरोधाला न जुमानता दिल्ली पोलीस चंद्रिका गेरा दीक्षितला पोलीस ठाण्यात घेऊन जात आहेत. मात्र, चंद्रिका गेरा दीक्षितला दिल्ली पोलिसांनी नक्की अटक केली आहे का? याबाबत चर्चा सुरु आहे.

बुधवार, १ मे रोजी सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. व्हिडीओमध्ये चंद्रिका आणि दिल्ली पोलिसांमध्ये जोरदार वाद होताना दिसत आहे. या वादानंतर तिला अटक करण्यात आली असा दावा करण्यात आला आहे. चंद्रिका गेरा दीक्षित ही आधी हल्दीराममध्ये काम करायची. हल्दीरामची नोकरी सोडल्यानंतर तिने दिल्लीच्या सैनिक विहारमध्ये रस्त्यावर वडापावची गाडी उभी करून मुंबई स्टाईल वडापाव विकायला सुरुवात केली. बघता बघता चंद्रिका अनेक कारणांमुळे सोशल मीडियावर व्हायरल झाली. परंतु रस्त्यावर गाडी लावण्यावर दिल्ली पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.

बघा व्हायरल व्हिडीओ

नेटिझन्सनी प्रतिक्रिया जाणून घ्या

अलीकडेच व्हायरल झालेल्या चंद्रिका गेरा दीक्षितच्या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, “तिने ज्या दिवशी रडण्याची मोहीम सुरू केली त्या दिवसापासून ती फसवणूक करतेय हे मला माहीत होते. “नव्या भारतात पैसा आणि प्रसिद्धी कुठे आहे हे तिला माहीत आहे,” दुसऱ्या युजरने कमेंट केली.

अनेक कारणांनी असते चर्चेत

चंद्रिकाने आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त दिल्लीतील पीतमपुरा भागात भंडारा आयोजित केला होता. यावेळीही चंद्रिकाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावेळी, गजबजलेल्या रस्त्यावर अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने लोकांनी जोरदार विरोध केला होता. एवढंच नाही तर गेल्या आठवड्यात दीक्षितची जमा झालेल्या जमावासोबत जोरदार बाचाबाची झाली होती. फक्त बाचाबाचीच नाही तर तिचे दुसऱ्या महिलेसोबत हातपाईसुद्धा झाली होती. मात्र, त्यावेळी काही पुरुषांनी मध्यस्थी करून महिलांना वेगळे केले, मात्र संतापलेल्या चंद्रिकाने आरडाओरडा सुरूच ठेवला होता.

समुद्रातील मासेमारीला लहान बोटी मुकणार; शासनाच्या निर्णयाला मच्छीमार कृती समितीचा विरोध

कामगारांच्या कामाचे तास वाढणार नाहीत; कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडून स्पष्टीकरण

मुंबईत घुसले १४ दहशतवादी, ३४ वाहनांमध्ये मानवी बॉम्बस्फोट घडवणार; अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना धमकी

Mumbai : लालबागच्या राजाचे अंतिम दर्शन घ्यायचे आहे? मग 'या' मार्गावर द्या बाप्पाला शेवटचा निरोप!

“शशी थरूर यांना स्पर्धक मिळाला”; पंजाबच्या महापुराबाबत पठ्ठ्याचं तोडकं-मोडकं इंग्रजी ऐकून नेटकरी लोटपोट, Video व्हायरल