Weather Update : येत्या चार दिवसांत अंदमानात पाऊस प्रातिनिधिक छायाचित्र
राष्ट्रीय

Weather Update : येत्या चार दिवसांत अंदमानात पाऊस

कडाक्याच्या उन्हापासून हैराण झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे.

Swapnil S

नवी दिल्ली/मुंबई : कडाक्याच्या उन्हापासून हैराण झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. नैऋत्य मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असून, येत्या ४ दिवसांत (१८ ते २० मे दरम्यान) मान्सून अंदमान आणि निकोबार बेटांवर धडकण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. तर केरळमध्ये मान्सूनचे आगमन ३१ मे किंवा १ जूनच्या सुमारास अपेक्षित असून बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता, ज्यामुळे पावसाचा जोर वाढेल.

मान्सूनपूर्व हालचाली वेगवान झाल्यामुळे दक्षिण भारतातील ५ राज्यांमध्ये पुढील काही तासांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यात केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्र होरपळणार : पुढील ३ दिवस उष्णतेची लाट?

मान्सून अंदमानात लवकर दाखल होत असला तरी, महाराष्ट्रात सध्या दुहेरी हवामानाचा अनुभव येत आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील २-३ दिवस उष्णतेची लाट कायम राहील. विदर्भासह उर्वरित महाराष्ट्रातही तापमानात मोठी वाढ होणार असल्याने पुढील ७२ तास राज्यासाठी अत्यंत कडक उन्हाचे असणार आहेत. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात नागरिकांना उन्हाच्या तीव्र झळा सहन कराव्या लागत आहेत. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंशांच्या पार गेले आहे, तर दक्षिण कोकण (सिंधुदुर्ग, रत्नागिरी) आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मान्सूनपूर्व हलक्या सरींची शक्यता आहे.

सामान्य माणसाच्या कल्याणासाठी काम करा; अर्थमंत्री सीतारामन यांचे प्राप्तिकर विभागाला निर्देश

Nashik : भरधाव ट्रक फ्लायओव्हरवरून थेट ५० फूट खाली कोसळला; सिन्नरमधील भीषण अपघाताचा VIDEO व्हायरल

महाराष्ट्रात ८७.७९ टक्के मतदार अर्जांचे वाटप पूर्ण; १ लाखाहून अधिक BLO कडून मतदार याद्यांचे पुनरीक्षण

Mumbai : तीन वर्षांची असताना गिळलं टोपण; टीबी-दमा समजून डॉक्टरांनी ७ वर्षे केले चुकीचे उपचार, अखेर मुलीच्या फुफ्फुसाचा भाग काढला

Mumbai : पोलिसांची गाडी रोखणाऱ्या 'त्या' तरुणीची सायबर सेलमध्ये धाव; ऑनलाइन छळ, अश्लील ट्रोलिंगविरोधात तक्रार