बंगाल सरकारचा शनिवारी शपथविधी 
राष्ट्रीय

बंगाल सरकारचा शनिवारी शपथविधी

पश्चिम बंगालमध्ये, नव्या भाजप सरकारचा शपथविधी समारंभ शनिवारी ९ मे रोजी कोलकाता येथील 'ब्रिगेड परेड ग्राउंड'वर सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा शपथविधी सोहळा होत आहे.

Swapnil S

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये, नव्या भाजप सरकारचा शपथविधी समारंभ शनिवारी ९ मे रोजी कोलकाता येथील 'ब्रिगेड परेड ग्राउंड'वर सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा शपथविधी सोहळा होत आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपशासित राज्यांचे अनेक मुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य यांनी बुधवारी ही माहिती दिली. त्यांनी पुढे असेही नमूद केले की, गुरूवारी ७ मे रोजी विधिमंडळ पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

दरम्यान, सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन माझी यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अमित शाह कोलकाता येथे दाखल होऊन आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करतील. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने पश्चिम बंगालमध्ये २०६ जागा जिंकून बहुमत मिळवले आहे.

ओमान किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावर हल्ला; १० भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण बेपत्ता

सायबर भामट्यांनी खाते रिकामे केले? घाबरू नका; पैसे परत मिळवण्यासाठी अशी करा तक्रार

व्हिडीओ एडिटिंग येत नाही? फक्त काही टॅप्समध्ये साधा व्हिडीओ होईल सिनेमॅटिक; Google Photos चं नवं एआय फीचर लॉन्च

Palghar Landslide : तांदुळवाडी किल्ल्याजवळ दरड कोसळली; पर्यटकांसाठी प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Mumbai : 'मराठीत बोला' म्हणणाऱ्या प्रवाशाला दोन तास RPF कार्यालयात बसवून ठेवले; व्हायरल VIDEO ची रेल्वेकडून चौकशी