राष्ट्रीय

पश्चिम बंगालच्या वनमंत्र्यांना ईडीकडून पहाटे साडेतीन वाजता अटक ; ममता बॅनर्जींचा संतापल्या...

ज्योतिप्रिय मलिक हे खाद्यमंत्री असताना मोठा ध्यान्य घोटाळा झाल्याचं ईडीचं म्हणणं आहे

नवशक्ती Web Desk

देशातील पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणूक पार पडत आहेत. असं असताना केंद्रीय यंत्रणांचा गैरवाप केला जात असल्याचा आरोप विरोधीपक्षांकडून केला जात आहे. देशातील अनेक राज्याती ईडीने कारवाई करायला सुरुवाक केली आहे. ईडीने कारवाई करण्याच्या टायमिंगवर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. नुकतंच, ईडीने राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे पुत्र वैभव गेहलोत यांना समन्स पाठवलं आहे. त्याशिवाय राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांच्या संपत्तीवर देखील छापेमारी केली आहे. त्यांनंतर आता ममता बॅनर्जी सरकारमधील मंत्री ज्योतिप्रिय मलिक यांच्याविरोधात देखील ईडीने कारवाई केली आहे. रेशन घोटाळाप्रकरणी मलिक यांना ईडीने अटक केली आहे.

ज्योतिप्रिय मलिक हे माजी खाद्यमंत्री असून सध्याच्या ममता सरकारमधघ्ये नवमंत्री आहेत. गुरुवारी दिवसभर चौकशी केल्यानंतर पहाटेच्या सुमारास ईडीने त्यांवर अटकेची कारवाई केली. शुक्रवारी सकाळी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास ज्योतिप्रिय मलिक यांना अटक केल्याने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. तसंच ईडीविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा देखील दिला होता.

त्यापूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांनी कोलकात्यातील साल्ट लेक भागात वनमंत्री मलिक यांच्या दोन फ्लॅटवर छापा टाकला होता. तसंच मलिक यांच्यासंबंधित अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. ज्योतिप्रिय मलिक हे खाद्यमंत्री असताना मोठा ध्यान्य घोटाळा झाल्याचं ईडीचं म्हणणं आहे. दरम्यान, ज्यातिप्रिय मलिक यांना अटक केल्यानंतर ईडीने त्यांनी वैद्यकीय तपासणीसाठी ईएसआयच्या रुग्णालयात नेले आहे.

पश्चिम बंगालचे मंत्री ज्योतिप्रिय मलिक यांच्या ठिकाणांवर ईडीने छापेमारी केल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ईडीवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता. ज्योतिप्रिय यांची पृकृती बरी नाही. ईडीच्या छापेमारीनंतर त्यांना काही झालं तर मी गुन्हा दाखल करेन, एवढच नाहीस भाजपला 'सबका साथ सबका विकास' हवा आहे असं म्हणतात. पण प्रत्यक्षात याचा अर्थ 'सबका साथ सबका विनाश' असा आहे, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

...तर मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीला धोका! मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप; २९,९६५ गणेशमूर्तीच विसर्जन

...तर भारताचा 'टॅरिफ' कमी करू! व्हाइट हाऊसचे सल्लागार पीटर नवारो यांचे वक्तव्य

शक्तीपीठ महामार्ग जमीन संपादनातून कोल्हापूर वगळले; शेतकऱ्यांच्या विरोधानंतर महायुतीचा निर्णय

दहावीची परीक्षा फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात; शालेय परीक्षा एप्रिल अखेरीसच; राज्याचे शैक्षणिक वेळापत्रक जाहीर