Photo : X (@braddy_Codie05)
राष्ट्रीय

पश्चिम सीमेवर तिन्ही दलांकडून 'त्रिशूल युद्ध अभ्यास' सराव

'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात हा सराव असेल. ज्याप्रकारे अलीकडेच सर क्रीक परिसरात पाकिस्तानी सैन्याच्या नापाक हरकती समोर आल्या आहेत, ते पाहता तिन्ही सैन्य दलाच्या या युद्ध अभ्यासाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली: भारताच्या तिन्ही सैन्य दलाकडून येत्या ३० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या काळात पश्चिम सीमेवर संयुक्त युद्ध सराव करण्यात येणार असल्याने पाकिस्तानचे धाबे दणाणले आहे. भारतीय लष्कर, नौदल आणि वायूसेना यांच्या संयुक्त ऑपरेशनला 'त्रिशूल युद्ध अभ्यास' नाव देण्यात आले आहे. 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात हा सराव असेल. ज्याप्रकारे अलीकडेच सर क्रीक परिसरात पाकिस्तानी सैन्याच्या नापाक हरकती समोर आल्या आहेत, ते पाहता तिन्ही सैन्य दलाच्या या युद्ध अभ्यासाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

भारताने त्रिशूल युद्ध अभ्यासासाठी नोटीस टू एअरमेन (नोटम) जारी केले आहे. नोटममध्ये म्हटले आहे की, तिन्ही सैन्य एक मोठा सराव करणार आहेत. ३० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर काळात पश्चिम सीमेवर होणाऱ्या 'त्रिशूल' सरावात तिन्ही सैन्य सहभागी होतील. या 'त्रिशूल' सरावाद्वारे तिन्ही सैन्य भारताच्या वाढत्या संयुक्ततेसह आत्मनिर्भर आणि इनोवेशनचे प्रदर्शन करतील, जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सशस्त्र दलांसाठी 'जय' दृष्टिकोनाचे आधारस्तंभ आहेत, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

'त्रिशूल' सरावात दक्षिण कमांडचे सैन्य महत्त्वाची भूमिका बजावेल. ते आव्हानात्मक कच्छ खाडी प्रदेश आणि पश्चिम सीमेवरील वाळवंटातील प्रदेशासह विविध ठिकाणी संयुक्त ऑपरेशन्स करतील. शिवाय भारतीय सैन्य सौराष्ट्र किनाऱ्यावरील समुद्रातदेखील ऑपरेशन्स करतील.

कल्याण-डोंबिवलीकरांना दिलासा; काळू धरण प्रकल्प लवकर पूर्ण होणार, एकनाथ शिंदेंचे आश्वासन

कारवाई तर होणारच! इंडिगोच्या कारभारावर मुरलीधर मोहोळ यांचा थेट इशारा

भाजप खासदाराच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळे थिरकल्या; कंगना रणौतचाही व्हिडीओ व्हायरल

स्मृती मानधना-पलाश मुच्छलचं लग्न मोडलं; दोघांचीही सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

Goa Nightclub Fire Update : आगीत २५ जणांचा दुर्दैवी अंत तर ६ जण जखमी, पंतप्रधान राष्ट्रीय निधीतून मदत जाहीर