नवी दिल्ली : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी दरम्यानच्या कालावधीत महाराष्ट्रातील मतदार याद्यांमध्ये जवळपास ७० लाख नवे मतदार मतदारयादीत समाविष्ट करण्यात आले, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी लोकसभेत केला. निवडणूक आयोगाने राज्यातील मतदारांबाबतची माहिती विरोधी पक्षांना द्यावी, अशी मागणीही गांधी यांनी केली. मतदारांची ही संख्या हिमाचल प्रदेश या राज्याच्या लोकसंख्येइतकी आहे, असेही गांधी म्हणाले.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर राहुल गांधी बोलत होते. महाराष्ट्रात गेल्या नोव्हेंबर महिन्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रामाणिकपणाबद्दल गांधी यांनी अनेक ७० लाख नवमतदार आले कुठून?
प्रश्न उपस्थित केले. विरोधी पक्षांनी मागणी केलेली माहिती निवडणूक आयोग उपलब्ध करून देणार नाही याची आपल्याला खात्री आहे, असेही ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला लक्षणीय यश मिळाले आणि विधानसभेच्या निवडणुकीत हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येइतके नवे मतदार मतदारयादीत समाविष्ट करण्यात आले, असे आपण सभागृहाच्या निदर्शनास आणून देऊ शकतो, असेही विरोधी पक्षनेते म्हणाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात हजर होते.जून महिन्यात झालेली लोकसभेची निवडणूक आणि त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात झालेली राज्य विधानसभेची निवडणूक यादरम्यानच्या कालावधीत ७० लाख मतदारांचा फरक आहे. महाराष्ट्रात पाच महिन्यांत जितके मतदार समाविष्ट करण्यात आले तितके पाच वर्षांतही झाले नाहीत, असा दावाही गांधी यांनी केला. याबाबत उदाहरण देताना ते म्हणाले की, शिर्डीतील एकाच इमारतीमध्ये लोकसभा निवडणुकीनंतर जवळपास सात हजार मतदार समाविष्ट करण्यात आले.