राष्ट्रीय

वेतनापेक्षा अधिक पेन्शन कोणत्या नोकरीत देतात? काँग्रेसचा सेबीप्रमुख माधबी पुरी यांना सवाल

कोणत्या नोकरीत वेतनापेक्षा निवृत्त वेतन अधिक देतात, असा प्रश्न काँग्रेसने सेबीप्रमुख माधबी पुरी-बुच यांना विचारला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : कोणत्या नोकरीत वेतनापेक्षा निवृत्त वेतन अधिक देतात, असा प्रश्न काँग्रेसने सेबीप्रमुख माधबी पुरी-बुच यांना विचारला आहे. निवृत्तीनंतर आयसीआयसीआय बँकेने माधबी पुरी-बुच यांना वित्तीय मदत दिली. त्यातून हितसंबंधाला बाधा येत आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी केला. २०१४-१५ मध्ये बुच व आयसीआयसीआय बँकेत सेटलमेंट झाली होती, तर २०१५-१६ मध्ये त्यांना आयसीआयसीआय बँकेकडून काहीच मिळाले नाही, तर २०१६-१७ मध्ये त्यांना पेन्शन पुन्हा कशी सुरू झाली, असे खेडा म्हणाले.

२००७-२००८ ते २०१३-१४ पर्यंत बुच यांचा आयसीआयसीआयमधील सरासरी पगार १.३० कोटी होता, तर पेन्शन सरासरी २.७७ कोटी आहे. ही कोणती नोकरी आहे, ज्यात पेन्शन वेतनापेक्षा अधिक आहे, असा सवाल खेडा यांनी केला.

२०१६-१७ मध्ये बुच या सेबीमध्ये पूर्णवेळ सदस्य बनलेल्या होत्या. त्यावेळी त्यांची २.७७ कोटी पेन्शन पुन्हा सुरू झाली, याकडे काँग्रेसने लक्ष वेधले.

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

Maratha Reservation Protest : सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसान भरपाईचे काय? उच्च न्यायालयाचा मराठा आयोजकांना सवाल

Mumbai : २३८ एसी लोकल खरेदीला मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४८२६ कोटींची मान्यता

कोकणातून परतणाऱ्या गणेशभक्तांचे हाल; मुंबई-गोवा महामार्गावर ३ किमीपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा