राष्ट्रीय

जम्मू-कश्मीरच्या पूंछमध्ये वणवा; आग आटोक्यात ; लष्कराची यशस्वी कारवाई

Swapnil S

जम्मू : जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात वणवा लागला, ज्यामुळे लष्कराला इतर सुरक्षा यंत्रणांच्या मदतीने वणवा आटोक्यात आणण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली.

रविवारी पहाटे जिल्ह्याच्या डेरा की गली क्षेत्राजवळ जंगलात ही मोठी आग लागली, ज्यामुळे अनेक लोकांचे जीव आणि पायाभूत सुविधांना धोका निर्माण झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.स्थानिक लष्कराच्या तुकडीने तातडीने या भागात धाव घेतली आणि इतर सुरक्षा यंत्रणांच्या मदतीने वणवा आटोक्यात आणण्यासाठी ऑपरेशन सुरू केले, असे त्यांनी सांगितले.

नागरी संस्था आणि सुरक्षा दलांच्या समन्वित प्रयत्नांमुळे वणव्याला आटोक्यात आणले गेले, असे जम्मूचे संरक्षण पीआरओ यांनी एक्सवर एका पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस