संग्रहित छायाचित्र 
राष्ट्रीय

नितीश पुन्हा मुख्यमंत्री होणार? रालोआच्या नेतेपदी आज निवडीची शक्यता; उद्या शपथविधी

बिहारच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा नितीश कुमार यांचीच निवड होण्याची दाट शक्यता आहे. नितीश कुमार यांची मंगळवारी होणाऱ्या रालोआ विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नेतेपदी निवड होण्याचे संकेत दिले जात आहेत.

Swapnil S

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत दणदणीत बहुमत मिळवलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीने सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. बिहारच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा नितीश कुमार यांचीच निवड होण्याची दाट शक्यता आहे. नितीश कुमार यांची मंगळवारी होणाऱ्या रालोआ विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नेतेपदी निवड होण्याचे संकेत दिले जात आहेत. नितीश कुमार यांची विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्यास २० नोव्हेंबरला ते शपथ घेण्याची शक्यता आहे.

बिहारचे मुख्यमंत्री म्हणून विक्रमी दहाव्यांदा शपथ घेणार असलेले कुमार यांची बुधवारी सकाळी ११ वाजता प्रथम जदयू विधिमंडळ पक्षनेते म्हणून निवड होईल. त्यानंतर दुपारी ३.३० वाजता रालोआच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्यावर ते आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल अरिफ मोहम्मद खान यांच्याकडे सुपूर्द करतील. नव्या सरकारच्या स्थापनेसाठी रालोआतील सर्व घटकपक्षांच्या पाठिंब्याची पत्रेही ते राज्यपालांना सादर करतील. सध्याची विधानसभा बुधवारपासून विसर्जित होणार आहे.

मुख्यमंत्र्यांसोबतच अन्य मंत्र्यांचा शपथविधी पाटण्याच्या ऐतिहासिक गांधी मैदानात होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्यासह काही मंत्र्यांनी आणि मुख्य सचिव प्रत्यय अमृत कुमार यांच्यासह शपथविधीच्या तयारीचा आढावा घेतला. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अन्य केंद्रीय मंत्री आणि रालोआशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, मंत्रिमंडळातील जागावाटप आणि विधानसभा अध्यक्षपदाबाबत रालोआच्या सहकारी पक्षांमध्ये तीव्र लॉबिंग सुरू आहे. अध्यक्षपदावर भाजप आणि जदयू या दोघांनीही दावा केला आहे, असे सूत्रांनी सांगितले.

"माझा मुलगा राजकारणात लहान"; अजित पवारांना आव्हान देणाऱ्या बाळराजेंच्या वडिलांनी मागितली माफी

‘ओंकार’ला गुजरातमध्ये स्थलांतरित करण्याला विरोध; वन्यजीव धोरणात फेरबदल करण्याची मागणी

Vasai–Virar : पाण्यावरून वाद विकोपाला; शेजारणीने चेहऱ्यावर 'मॉस्किटो किलर स्प्रे' फवारल्याने ५७ वर्षीय पुरुषाचा मृत्यू

ठाण्यात पुन्हा कचराकोंडी; डायघरमध्ये कचरा टाकण्यास रहिवाशांचा विरोध

Mumbai : 'मिनी इंडिया'तील शौचालयांची 'शोकांतिका' ; मूलभूत अधिकारासाठी धारावीकरांची दैनंदिन कुचंबणा