विंडफॉल कर आता दुप्पट; दरवाढ तत्काळ प्रभावाने लागू 
राष्ट्रीय

विंडफॉल कर आता दुप्पट; दरवाढ तत्काळ प्रभावाने लागू

केंद्र सरकारने डिझेल आणि विमान इंधनाच्या (एटीएफ) निर्यातीवरील म्हणजेच 'विंडफॉल टॅक्स'मधील वाढ आता दुप्पट करण्यात आली आहे. डिझेलवरील कर प्रति लिटर आता ५५.५ रुपये, तर विमान इंधनावरील कर प्रति लिटर ४२ रुपये असेल.

Swapnil S

नवी दिल्ली : केंद्र सरकारने डिझेल आणि विमान इंधनाच्या (एटीएफ) निर्यातीवरील म्हणजेच 'विंडफॉल टॅक्स'मधील वाढ आता दुप्पट करण्यात आली आहे. डिझेलवरील कर प्रति लिटर आता ५५.५ रुपये, तर विमान इंधनावरील कर प्रति लिटर ४२ रुपये असेल. ही दरवाढ तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली असल्याची माहिती अर्थ मंत्रालयाने एका अधिसूचनेद्वारे दिली आहे.

२६ मार्च रोजी सरकारने डिझेलवर प्रति लिटर २१.५० रुपये आणि विमान इंधनावर २९.५ रुपये निर्यात शुल्क लागू केले होते. आशियातील युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत देशांतर्गत इंधनाची उपलब्धता वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले होते. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने निर्यातदारांनी त्याचा अवाजवी फायदा घेऊ नये, हादेखील यामागील उद्देश होता. पेट्रोलवरील निर्यात शुल्क मात्र अद्याप शून्य ठेवण्यात आले आहे.

UPI वरील शुल्काचा भार व्यापाऱ्यांवर नको; दिल्लीतील व्यापाऱ्यांना धास्ती, पुन्हा रोखीकडे वळण्याचा निर्णय

१५ वर्षे पूर्ण झालेली मुस्लिम मुलगा-मुलगी लग्नासाठी सक्षम; पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाचा वादग्रस्त निर्णय

शाहझाद भट्टी टोळी दहशतवादी संघटना घोषित; गृह मंत्रालयाकडून UAPA कायद्यांतर्गत बंदी, देशभरातून २०० जणांना अटक

तृतीयपंथीयांना घर नाकारले तर कारवाई; राज्य सरकारचा इशारा

Mumbai : दोन हजार कोटी खर्चुन हॉटेल, पार्किंग हब, शॉपिंग मॉल; मानखुर्द जकात नाक्यावर ३० मजली इमारत