राष्ट्रीय

रील बनवताना महिलेची झाली फजिती; व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

हल्ली सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी अनेकजण धुमाकूळ घालताना दिसतात. फक्त व्ह्यूज आणि लाइक्ससाठी कोण काय करेल याचा काही नेम नाही. मंदिर, देवळं, पवित्र स्थळं हेही आता रील बनवण्यासाठीचे 'लोकेशन्स' झाले आहेत.

नेहा जाधव - तांबे

हल्ली सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी अनेकजण धुमाकूळ घालताना दिसतात. फक्त व्ह्यूज आणि लाइक्ससाठी कोण काय करेल याचा काही नेम नाही. मंदिर, देवळं, पवित्र स्थळं हेही आता रील बनवण्यासाठीचे 'लोकेशन्स' झाले आहेत. त्यासोबतच देवाचे सोशल मीडियापूरते भक्तही तयार झाले आहेत. अशाच एका महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे, जो पाहून तुम्हालाही पोट धरून हसू येईल.

हा व्हिडिओ ‘कुंभकरण’ नावाच्या युजरने 'X' वर पोस्ट केला आहे. व्हिडिओत एक महिला पिवळ्या साडीमध्ये, मोकळे केस सोडून, महादेवाच्या पिंडीजवळ एका गाण्यावर नृत्य करत Reel शूट करताना दिसते. रील करत असतानाच तिचा अचानक तिचा तोल जातो आणि ती थेट बाजूच्या तळ्यात जाऊन पडते! “महादेवने भक्ति का फल तुरंत दे दिया'' असं या व्हिडिओला caption देण्यात आली आहे.

पाहा व्हिडिओ -

हा प्रसंग इतका मजेशीर आहे की नेटकऱ्यांनी लगेचच त्यावर विनोदी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. अशा प्रकारच्या घटनांमुळे एक बाब मात्र अधोरेखित होते, प्रसिद्धीच्या नादात अनेकदा लोक सुरक्षिततेचा विचारही करत नाहीत. रील बनवणं आजच्या पिढीसाठी आकर्षण ठरलं असलं, तरी हे करताना जागेची पवित्रता, इतरांची भावना आणि स्वतःची सुरक्षितता याचं भान ठेवणं आवश्यक आहे.

४ दिवसांपूर्वीच जामिनावर सुटून घरी आला आणि… ; परभणी संविधान शिल्प विटंबना प्रकरणातील आरोपी दत्ता पवारची आत्महत्या

डोनाल्ड ट्रम्प 'व्हेनेझुएलाचे कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष'; स्वतःच केले जाहीर; ट्रुथ सोशलवरील पोस्टने खळबळ

RTI अंतर्गत एनपीए, थकबाकीदारांची माहिती सार्वजनिक होणार? RBI च्या भूमिकेविरोधात ४ प्रमुख बँकांची CIC कडे धाव

जी-उत्तर : मुंबईतील महत्त्वाच्या राजकीय लढतींचा केंद्रबिंदू; तीन नवीन मेट्रो स्थानकांमुळे धारावी परिसराची शहराशी जोडणी अधिक सुलभ

...तर अमेरिकन, इस्रायली सैन्य लक्ष्य ठरेल; इराणचा सडेतोड इशारा