भारताचा GDP ७.१ टक्के? विकासदर वाढीचा अंदाज जागतिक बँकेने उंचावला 
राष्ट्रीय

भारताचा GDP ७.१ टक्के? विकासदर वाढीचा अंदाज जागतिक बँकेने उंचावला

पहिल्या तिमाहीतील अपेक्षेपेक्षा चांगल्या कामगिरीमुळे, जागतिक बँकेने मंगळवारी चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा जीडीपी (विकास दर) वाढीचा अंदाज ०.५ टक्क्यांनी वाढवून ७.१ टक्के केला आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये हा अंदाज वर्तवण्यात आला होता.

Swapnil S

नवी दिल्ली : पहिल्या तिमाहीतील अपेक्षेपेक्षा चांगल्या कामगिरीमुळे, जागतिक बँकेने मंगळवारी चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा जीडीपी (विकास दर) वाढीचा अंदाज ०.५ टक्क्यांनी वाढवून ७.१ टक्के केला आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये हा अंदाज वर्तवण्यात आला होता.

जागतिक बँकेने आपल्या ताज्या ‘इंडिया डेव्हलपमेंट अपडेट’मध्ये म्हटले आहे की, व्यापार आणि भू-राजकीय अनिश्चितता असूनही वाढ अपेक्षेपेक्षा चांगली राहिल्यामुळे, आम्ही चालू आर्थिक वर्षाच्या वाढीचा अंदाज एप्रिलमधील ६.६ टक्क्यांवरून ७.१ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.

अनुकूल धोरण आणि पतपुरवठा वातावरणाने व्यापार तणावावर मात केल्यामुळे तसेच मजबूत गुंतवणूक आणि खासगी उपभोग यामुळे गेल्या आर्थिक वर्षाचा भारताचा विकासदर ७.२ टक्क्यांवरून वाढून ७.८ टक्क्यांवर पोहोचला.

बँकेने म्हटले आहे की, सुरुवातीला कृषी क्षेत्राची मजबूत कामगिरी, ग्रामीण उत्पन्न समर्थन, अन्न अनुदान आणि कमी महागाई यामुळे ग्रामीण उपभोगाने शहरी मागणीला मागे टाकले, तर वर्षाच्या उत्तरार्धात प्राप्तिकर सवलत आणि जीएसटी कपातीमुळे शहरी उपभोग मजबूत झाला. हाच वेग चालू आर्थिक वर्षातही कायम राहिला असून, अपेक्षेपेक्षा जास्त म्हणजेच पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढ ७.८ टक्के नोंदवली गेली, आणि त्यानंतरच्या तिमाहींमध्ये ती मंदावली, असे त्यात नमूद केले आहे. खासगी उपभोग हा वाढीचा मुख्य स्रोत राहण्याची अपेक्षा आहे, जरी ऑगस्टपर्यंतच्या अल्प पावसामुळे ग्रामीण मागणीवर काहीसा परिणाम होऊ शकतो, तर सरकारी उपभोग मर्यादित राहील, असे बँकेने म्हटले आहे.

गुंतवणुकीचे चित्र मोठे तसेच कायम आहे. जागतिक अनिश्चिततेमुळे खासगी गुंतवणुकीवर थोडा ताण येत आहे, परंतु मजबूत सार्वजनिक गुंतवणुकीसह अनुकूल वित्तीय आणि धोरणात्मक परिस्थितीमुळे अंशतः समतोल साधला गेला आहे, असे सांगण्यात आले.

भारताची निर्यात अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करत असून, एप्रिलच्या अंदाजाच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षाच्या वाढीसाठी ती मुख्य सकारात्मक बाजू ठरेल, असे बँकेचे म्हणणे आहे.

अंदाज उंचावण्यास कारण की...

  • ग्रामीण आणि शहरी उपभोग : सुरुवातीला कृषी क्षेत्राची चांगली कामगिरी, ग्रामीण उत्पन्न आधार आणि कमी महागाईमुळे ग्रामीण उपभोग शहरी मागणीच्या पुढे होता. वर्षभरात आयकर सवलत आणि जीएसटी कपातीमुळे शहरी उपभोगही मजबूत झाला.

  • कृषी आणि उद्योग क्षेत्र : जुलैपासूनच्या पावसामुळे मान्सूनमधील तूट कमी झाली असली, तरी एकूण पर्जन्यमान कमी राहिल्याने कृषी क्षेत्राच्या समस्येत भर पडली आहे. मात्र, उद्योग क्षेत्राने (पायाभूत सुविधा आणि वीज क्षेत्र) अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करत कृषी क्षेत्रातील कमकुवतपणा भरून काढला आहे.

  • निर्यात: भारताची निर्यात अपेक्षेपेक्षा चांगली राहिली असून, एप्रिलच्या अंदाजाच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षाच्या वाढीसाठी ती मुख्य सकारात्मक घटक ठरणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

बदलापूरच्या रस्त्यावर थुंकल्यास ५०० रुपये दंड; नियमांचे पालन करा, नगर परिषदेचे आवाहन

Mumbai : सत्कार केटरर्ससह ८ उपाहारगृहांचे परवाने निलंबित; अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या उल्लंघनेनंतर FDA ची कारवाई

Mumbai : न्यायालयाच्या कामकाजाचे गुपचूप रेकॉर्डिंग करणे पडले महागात

Ulhasnagar : महापालिकेतील सत्तासंघर्ष थेट पोलिसांच्या दारात; शिवसेना-भाजपच्या दोन्ही गटांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

APMC मध्ये कोथिंबीर तेजीत; स्वयंपाकघराची चवच बिघडली, जुडीचा भाव थेट ४५ रुपयांवर, आवक घटल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री