पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या तरुणाला अटक 
राष्ट्रीय

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या तरुणाला अटक

अलवार येथील इतराणा लष्करी छावणीतून पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून सुरक्षा यंत्रणांनी एका तरुणाला ताब्यात घेतले आहे.

Swapnil S

जयपूर : अलवार येथील इतराणा लष्करी छावणीतून पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून सुरक्षा यंत्रणांनी एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, जोधपूरचा रहिवासी असलेला कुंदन बिश्नोई (२०) हा पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह (पीआयओ) साठी सक्रिय एजंट म्हणून काम करत होता.

सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, बिश्नोई पैशांच्या मोबदल्यात भारतीय लष्कराची छावणी आणि संवेदनशील भागांची माहिती पाकिस्तानला पुरवत असे. या पैशांचा वापर तो माहिती गोळा करण्यासाठी छावणी परिसरात राहणाऱ्या शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी मैत्री करण्यासाठी करत असे. त्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यानही पाकिस्तानला गुप्त माहिती पाठवली होती.

कुंदनने इतराणा लष्करी छावणीत राहणाऱ्या एका तरुणाशी मैत्री केली होती, ज्याच्या माध्यमातून त्याने छावणीत प्रवेश मिळवला. रविवारी रात्री तो छावणीच्या आवारात एका विद्यार्थिनीशी गप्पा मारत असताना, संशयावरून लष्कराच्या जवानांनी त्याला ताब्यात घेतले.

देशात सर्वात कोरडा मान्सून; एल-निनोचा फटका; सरासरीपेक्षा १५ टक्के कमी पाऊस

Mumbai : फेरीवाल्यांवरील कारवाईत समन्वयाचा अभाव; विधी समितीत हरकतीचा मुद्दा

Mumbai : खारमधील पुनर्विकासाला मंजुरी; रामकृष्णनगरच्या रहिवाशांना मिळणार मोठी घरे

Mumbai : चॉकलेटपासून साकारला नक्षीदार बाप्पा; ४ फूट उंच, तर ७५ किलो वजनाची मूर्ती

उद्घाटनापूर्वीच श्रेयाची 'लढाई'; जिजाऊ प्रवेशद्वारावर पालकमंत्र्यांचे नाव; मराठा समाजासह विविध संघटनांचा विरोध, नाव हटविण्याची मागणी