राष्ट्रीय

Video | कामावर वाटू लागले अस्वस्थ, विश्रांतीसाठी बसताच कोसळला तरुण; मन हेलावून टाकणाऱ्या घटनेचा व्हिडिओ समोर

मन हेलावून टाकणारी ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

Rakesh Mali

मरण कोणालाच चुकलेले नाही असे म्हणतात. सकाळी घरातून निघणारा माणूस घरी परत येईलच याचीही कोणी शाश्वती देऊ शकत नाही. कोणताही क्षण हा शेवटचा असू शकतो. याचीच प्रचिती येणारी एक घटना नुकतीच समोर आली आहे. इंदौर येथे पेंटरकाम करणाऱ्या एका तरुणाला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मन हेलावून टाकणारी ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 26 डिसेंबर रोजी इंदौरमध्ये घडली असल्याचे सांगितले जात आहे. यात तुषार नावाचा एक पेंटरकाम करणारा तरुण काम करताना दिसत आहे. यादरम्यान त्याला अस्वस्थ वाटू लागते. तो जरा वेळ विश्रांती घेऊन पाण्याने तोंड धुतो. यानंतर तो एक बकेट उलटी करुन त्यावर बसतो. त्याच्या हालचालींवरुन तो खूप जास्त अस्वस्थ दिसतो. यावेळी अचानक त्याला हृदय विकाराचा तीव्र झटका येऊन तो पाठीवर कोसळतो.

आशिष कोसळल्याचे लक्षात येताच त्याचे दोन सहकारी तात्काळ त्याच्या मदतीला धावतात. ते आरडाओरड करुन मदतीसाठी याचना करतात. त्याला जागे करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, तोपर्यंत आशिषचा मृत्यू झालेला असतो.

यापूर्वी देखील अगदी तरणीताठी मुले हृदयविकाराच्या झटक्याने गेल्याच्या घटना घडल्या आहेत. काहींना तर व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

दरम्यान, तरुणांच्या अकस्मात मृत्यू होण्याचा संबंध कोविड-19 च्या लसीकरणाशी जोडला जातो. मात्र, तरुणांना अचनाक मृत्यू येण्याचे नेमके कारण कोणते, याबाबत पुरवाव्यानिशी कुठलीही माहिती नसल्याचे सरकारकडून जुलै महिन्यात लोकसभेत सांगण्यात आले होते.

हॉटेल उद्योगावर मंदीचे सावट; शुल्क कमी न केल्यास ‘हॉटेल बंदचा’ व्यावसायिकांचा इशारा

IND vs ENG 2025 : क्रिकेटच्या पंढरीत भारताची कसोटी! लॉर्ड्स स्टेडियमवर आजपासून तिसरा सामना, मालिकेत आघाडी घेण्याचे लक्ष्य

भारतीय वंशाचे सबिह खान Apple चे नवे COO; लवकरच घेणार जेफ विल्यम्स यांची जागा

लैंगिक छळाच्या तक्रारीनंतर केलेली बदली रद्द; सहाय्यक प्राध्यापक महिलेला उच्च न्यायालयाचा दिलासा

BEST चे कंत्राटी कर्मचारी संप पुकारण्याच्या तयारीत; संपाच्या निर्णयासाठी मतदान सुरू