झाकीरच्या संघटनेवरील बंदी ५ वर्षांनी वाढविली 
राष्ट्रीय

झाकीरच्या संघटनेवरील बंदी ५ वर्षांनी वाढविली

फरार इस्लामिक धर्मोपदेशक झाकीर नाईक याच्या नेतृत्वाखालील ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’ (आयआरएफ) ही संस्था दहशतवाद आणि फुटीरतावादाच्या विचारधारेचा प्रसार करत आहे...

Swapnil S

नवी दिल्ली : फरार इस्लामिक धर्मोपदेशक झाकीर नाईक याच्या नेतृत्वाखालील ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’ (आयआरएफ) ही संस्था दहशतवाद आणि फुटीरतावादाच्या विचारधारेचा प्रसार करत आहे. हिंसक कारवायांना चिथावणी देणे, फरार दहशतवाद्यांना पुन्हा एकत्र करणे आणि जातीय तेढ निर्माण करत असल्याच्या पार्श्वभूमीवर या संघटनेवरील बंदी आणखी पाच वर्षांसाठी वाढवण्यात आली आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.

एक्सवरील एका संदेशात शहा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहशतवाद आणि देशविरोधी कारवायांविरोधातील 'शून्य सहनशीलता' (झीरो टॉलरन्स) धोरणानुसार गृह मंत्रालयाने 'बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्या'अंतर्गत 'आयआरएफ'ला बेकायदेशीर संघटना ठरवून तिच्यावरील बंदी वाढवली आहे."फरार दहशतवादी धर्मोपदेशक डॉ. झाकीर नाईक याच्या नेतृत्वाखालील ही संघटना जातीय द्वेष भडकावणे आणि दहशतवादाला चालना देण्यासह भारताविरुद्धच्या अनेक कुरापतींमध्ये सामील आहे," असे ते म्हणाले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मायक्रोसॉफ्ट सेवा ठप्प; तांत्रिक बिघाडाचा फटका आशियापासून अमेरिकेपर्यंत

मोदी माझा फोन टॅप करतात...; राहुल गांधी यांचा खळबळजनक आरोप

Mumbai : कोस्टल रोडवरील बोगद्यात ६ वाहनांचा विचित्र अपघात; धडकेनंतर SUV ने घेतला पेट

Assam Accident: काझीरंगानजीक बस-ट्रकची टक्कर; २४ प्रवाशांचा मृत्यू

भारतीय युवकांसमोर आज पाकिस्तानचे कडवे आव्हान; १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याची चर्चा