नवी मुंबई

कामोठे येथे ४ वाहनांचा विचित्र अपघात

पनवेलहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या टी परमिट कार चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने त्याच्या पाठीमागून भरधाव वेगाने येणारी कार व आणखी २ कार एकमेकांवर धडकल्याची घटना सोमवारी सकाळी सायन-पनवेल मार्गावरील कामोठे येथील उड्डाणपुलावर घडली.

Swapnil S

पनवेल : पनवेलहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या टी परमिट कार चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने त्याच्या पाठीमागून भरधाव वेगाने येणारी कार व आणखी २ कार एकमेकांवर धडकल्याची घटना सोमवारी सकाळी सायन-पनवेल मार्गावरील कामोठे येथील उड्डाणपुलावर घडली. या अपघातात कुणीही जखमी झाले नसले तरी या चारही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातामुळे सायन-पनवेल मार्गावर काही काळ वाहतूककोंडी झाली होती. मात्र, कळंबोली वाहतूक पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून अर्ध्या तासात वाहतूक सुरळीत केली.

या अपघातातील टी परमिट कार सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जात होती. ही कार कामोठे उड्डाणपुलावर आली असताना, वॅगनार कार चालकाने अचानक ब्रेक दाबून आपली कार थांबवली. त्यामुळे त्याच्या पाठीमागून भरधाव वेगाने येणारी होंडा सिटी कार त्याच्यावर धडकली. त्यानंतर होंडा सिटी कारवर त्याच्या पाठीमागून येणारी इतर दोन वाहने एकमेकांवर धडकल्या. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झाले नाहीत. मात्र या चारही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातामुळे चारही वाहने रस्त्यात अडकून पडल्याने सायन-पनवेल मार्गावर काही काळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

तृतीयपंथीयांना घर नाकारले तर कारवाई; राज्य सरकारचा इशारा

Mumbai : दोन हजार कोटी खर्चुन हॉटेल, पार्किंग हब, शॉपिंग मॉल; मानखुर्द जकात नाक्यावर ३० मजली इमारत

Mumbai : लालबागमधून इंदूरच्या चोरट्यांना अटक; सोन्याची साखळी, रोख रक्कम, मोबाईलची केली चोरी

नाव वगळलेल्या पात्र नागरिकांना आणखी एक संधी; चार दिवस विशेष मतदार नोंदणी शिबिर, ३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करता येणार

निर्भेळ यशासाठी भारतीय संघ सज्ज; अफगाणिस्तानविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना; वैभवला संधी मिळण्याची शक्यता