एक्स@Rajmajioffi
नवी मुंबई

APMC मार्केटमधील ठेकेदारावर जुईनगरमध्ये गोळीबार

एपीएमसी मार्केटमधील कचरा उचलण्याचा ठेका घेणारे ठेकेदार राजाराम ढोके (४८) यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास जुईनगर रेल्वे स्थानकाजवळ घडली.

Swapnil S

नवी मुंबई : एपीएमसी मार्केटमधील कचरा उचलण्याचा ठेका घेणारे ठेकेदार राजाराम ढोके (४८) यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास जुईनगर रेल्वे स्थानकाजवळ घडली. या गोळीबारात राजाराम ढोके यांना ४ गोळ्या लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वाशीतील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सानपाडा पोलिसांसह क्राईम ब्रँचच्या पथकाकडून हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

या घटनेतील जखमी ठेकेदार राजाराम ढोके हे घाटकोपर येथे राहण्यास असून त्यांच्याकडे एपीएमसी मार्केटमधील कचरा उचलण्याचा ठेका आहे. शुक्रवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास ढोके हे जुईनगर रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या महापालिकेच्या विभाग कार्यालयात कामानिमित्त आले होते. याचवेळी एका दुचाकीवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी भररस्त्यावर त्यांच्याकडील रिव्हॉल्व्हरमधून ढोके यांच्यावर गोळीबार करत ५ ते ६ राऊंड फायर केले. यातील ४ गोळ्या ढोके यांना लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर दोघा हल्लेखोरांनी दुचाकीवरून पलायन केले.

या घटनेची माहिती मिळताच सानपाडा पोलिसांसह क्राईम ब्रँचच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तसेच हल्लोखोरांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात येत आहे.

जखमी ढोके यांचा एपीएमसी मार्केटमध्ये कचरा उचलण्याचा ठेका असून त्यातील वादातून हा गोळीबार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. जखमी ढोके यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून ते बोलण्याच्या स्थितीत नाहीत. त्यांच्याकडून याबाबत अधिक माहिती घेण्यात येत असल्याचे परिमंडळ-१चे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी सांगितले.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री