Navi Mumbai : बेलापूरमध्ये सुरेल गीतांचा नजराणा अन् एकतेचा संदेश 
नवी मुंबई

Navi Mumbai : बेलापूरमध्ये सुरेल गीतांचा नजराणा अन् एकतेचा संदेश

उगवत्या सूर्याला नमन, अंधाराकडून प्रकाशाकडे वाटचाल आणि मानवता, समानता व एकतेचा संदेश देत बेलापूरवासीयांनी लायन गार्डन, सेक्टर ३ए येथे २०२६ ची मानाची ‘दिवाळी पहाट’ उत्साहात साजरी केली. शेकडो रसिकांच्या उपस्थितीत दिव्यांच्या प्रकाशाने उजळलेल्या वातावरणात संगीताची सुरेल मैफल रंगली.

Swapnil S

बेलापूर : उगवत्या सूर्याला नमन, अंधाराकडून प्रकाशाकडे वाटचाल आणि मानवता, समानता व एकतेचा संदेश देत बेलापूरवासीयांनी लायन गार्डन, सेक्टर ३ए येथे २०२६ ची मानाची ‘दिवाळी पहाट’ उत्साहात साजरी केली. शेकडो रसिकांच्या उपस्थितीत दिव्यांच्या प्रकाशाने उजळलेल्या वातावरणात संगीताची सुरेल मैफल रंगली.

गणेश आणि सरस्वती वंदना, स्वरमंचाचे पूजन, दीपप्रज्वलन आणि मंत्रोच्चारांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली. बेलापूरच्या गानकोकिळा गायिका अर्चना भंडारे यांच्यासह स्थानिक कलाकार अजय मेहरा, समीर पोतदार, विष्णू सोनी आणि पंडित घोरपडे यांनी हिंदी व मराठी गीतांचे बहारदार सादरीकरण केले. त्यांच्या सुरेल गायनावर रसिकांसह उपस्थित मान्यवर आणि लोकप्रतिनिधींनीही ठेका धरला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नगरसेवक तथा आरोग्य समिती सभापती डॉ. जयाजी नाथ, माजी नगरसेविका शैला नाथ, माजी नगरसेवक अशोक गुरखे, नगरसेविका स्वाती साटम, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा नवी मुंबई काँग्रेस जिल्हाध्यक्ष आबा दळवी, शिवसेनेचे जसपाल सिंग अटवाल आणि २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात कर्तव्य बजावताना शहीद झालेले पोलीस कर्मचारी योगेश पाटील यांचे वडील शिवाजी पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

पर्यावरणाचा समतोल राखण्याचे आवाहन

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमातून पाणी वाचवा, वीज वाचवा आणि निसर्ग वाचवा, असा संदेश देण्यात आला. पर्यावरणाचा समतोल राखण्याचे आवाहन करत छोट्या कृतीतूनही दुष्काळग्रस्त गावांना मदतीचा हात देता येऊ शकतो, याची जाणीव नागरिकांना करून देण्यात आली. या उपक्रमाला ‘नवशक्ति’ आणि ‘फ्री प्रेस जर्नल’ यांचे माध्यम प्रायोजक म्हणून सहकार्य लाभले. संगीत, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी बेलापूरची दिवाळी पहाट रसिकांसाठी संस्मरणीय ठरली.

मुंबईत पाणीकपात वाढणार? BMC ची राखीव पाण्यासाठी फिल्डिंग, ७ धरणांत फक्त ८२.४७ टक्के पाणी, ६ महिने आधीच राज्य सरकारला पत्र

Mumbai : फटाक्यामुळे लागली आग; विरार-नालासोपारादरम्यान लोकल सेवेला फटका, सिग्नल यंत्रणेत बिघाड; प्रवाशांचे हाल

Mumbai : रेल्वे मार्गालगतच्या घरांवरील कारवाईला स्थगिती द्या! उच्च न्यायालयात याचिका दाखल

Mumbai : जन्मतः अवघ्या ७०० ग्रॅम वजनी बालकाला संजीवनी; KEM रुग्णालयात यशस्वी उपचारांनंतर डिस्चार्ज

Mumbai: फटाके बंदीचा बार फुसका; दोन दिवसांत आगीच्या ८९ घटना, फटाक्यांमुळे २८ ठिकाणी अग्निभडका, एकाचा मृत्यू; तीन जखमी