नवी मुंबई

एनएमएमटी चालकाला मोबाईल वापरणे महागात पडले, Video व्हायरल होताच झाली कारवाई

Swapnil S

नवी मुंबई : एनएमएमटीचा एक चालक गाडी चालवताना मोबाईल वापरत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात सदर चलन एनएमएमटीचा असून उलवा ते नेरूळ बस चालवत असल्याचे सांगण्यात आले. सदर चित्रफीत एनएमएमटी प्रशासन पर्यंत पोहचल्यावर त्याची शहनिशा करीत त्या चालकाला निलंबित करण्यात आले असल्याची माहिती एनएमएमटीचे व्यवस्थापक योगेश कडुस्कर यांनी दिली आहे. महादू जठार असे या चालकाचे नाव आहे.

जठार हे एनएमएमटीचे कायमस्वरूपी सेवेतील कर्मचारी आहेत. ते बस मार्ग क्रमांक १७ नेरूळ बामनडोंगरी या बसवर चालक म्हणून कार्यरत आहेत.नुकतेच ते बस चालवत असताना मोबाईलवर बोलत होते. यासंदर्भात प्रवाशांनी काढलेला व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. अशा बस चालकांमुळे प्रवाशांच्या जीवाला धोका असल्याच्या बाबत अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावरती व्यक्त केल्या गेल्या. तसेच प्रशासन अशा चालकांवर कारवाई करत नसल्यानेच त्यांची पुन्हापुन्हा अशाप्रकारे नियम मोडण्याची हिंमत होत असल्याची प्रतिक्रिया ही अनेक लोकांनी व्यक्त केली. अखेरीस हा विषय गांभीर्याने घेत प्रशासनाने संबंधित चालकाला कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा सादर करण्यास सांगितले. हा खुलासा अमान्य करत २४ तासांमध्ये जठार यांना तत्काळ निलंबित करण्यात आले. त्याचप्रमाणे त्यांची विभागीय चौकशी देखील प्रस्तावित करण्यात आली आहे.

फक्त ६५ हजारात मिळतीये Electric Scooter, चालवण्यासाठी लायसन्सचीही गरज नाही; जाणून घ्या रेंज अन् किंमत

पुणे विमानतळावर अपघात; 'टग ट्रॅक्टर'ला धडकले एअर इंडियाचे १८० प्रवाशांनी भरलेले विमान

कार्तिक आर्यनच्या नातलगांचा घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृत्यू, मुंबईत झाले अंत्यसंस्कार

होर्डिंग पॉलिसी लवकरच, तोपर्यंत नवीन होर्डिंगना परवानगी नाही

CSMT तील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी आजपासून १५ दिवस ब्लॉक