नवी मुंबईत आफ्रिका-भारत बिझनेस सेंटरची उभारणी; खारघरमध्ये २० एकर जागा राखीव, आंतरराष्ट्रीय व्यापारासह रोजगाराला चालना प्रातिनिधिक छायाचित्र
नवी मुंबई

नवी मुंबईत आफ्रिका-भारत बिझनेस सेंटरची उभारणी; खारघरमध्ये २० एकर जागा राखीव, आंतरराष्ट्रीय व्यापारासह रोजगाराला चालना

महाराष्ट्राला भारत-आफ्रिका सहयोगाचे जागतिक केंद्र बनवण्याच्या उद्देशाने सिडको आणि आफ्रिका इंडिया इकॉनॉमिक फाऊंडेशन यांच्यात १४ मे रोजी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला.

Swapnil S

नवी मुंबई : महाराष्ट्राला भारत-आफ्रिका सहयोगाचे जागतिक केंद्र बनवण्याच्या उद्देशाने सिडको आणि आफ्रिका इंडिया इकॉनॉमिक फाऊंडेशन यांच्यात १४ मे रोजी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. हा करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पार पडला.

हा प्रकल्प नवी मुंबईतील खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्क (आयसीपी) मधील २० एकर जमिनीवर साकारला जाणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जेएनपीए बंदराच्या जवळ असल्यामुळे या केंद्राला जागतिक व्यापारासाठी धोरणात्मक महत्त्व प्राप्त होणार आहे. या प्रकल्पासाठी विशेष हेतू कंपनी (एसपीव्ही) स्थापन करण्यात आली असून, यात आफ्रिका इंडिया इकॉनॉमिक फाऊंडेशनचा ७४ टक्के तर सिडकोचा २६ टक्के हिस्सा असेल. पुढील ५ ते ६ वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार असून सहाव्या वर्षापर्यंत सुमारे ३० दशलक्ष अमेरिकन डॉलर महसूल अपेक्षित आहे.

या प्रसंगी अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता, सिडको चे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, सहव्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल, आफ्रिका इंडिया इकॉनॉमिक फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. जी. रथिनावेलू आणि भारताचे संयुक्त राष्ट्रातील माजी स्थायी प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा प्रकल्प महाराष्ट्राला जागतिक व्यापाराचे केंद्र बनवणारा असल्याचे सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तो आंतरराष्ट्रीय गुंतवणूक व व्यापारासाठी महत्त्वाचा दुवा ठरेल असे नमूद केले, तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी एमएसएमई आणि रोजगारनिर्मितीस चालना मिळेल असे मत व्यक्त केले.

हा प्रकल्प दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या धर्तीवर विकसित केला जाणार असून यामध्ये खालील प्रमुख सुविधा असतील.

  • ५४ आफ्रिकी देशांसाठी सेंट्रल बिझनेस टॉवर

  • ५,००० ते ६,००० आसनक्षमतेचे कन्व्हेन्शन व एक्झिबिशन सेंटर

  • सुमारे २.५ लाख चौरस फूट प्रदर्शन क्षेत्र

  • हॉस्पिटॅलिटी हब (हॉटेल्स व सर्व्हिस अपार्टमेंट्स)

  • आफ्रिका-भारत बायो डोम व सांस्कृतिक केंद्र

कोलकात्यात बांधकामाधीन गोदामाचे छत कोसळले; ३ ठार, अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, Video

Mumbai : महापौरांसमोरच मॅनहोलमध्ये पडला सफाई कर्मचारी; अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा, Video

'सत्य सांगणं इतकं कठीण झालंय का?' केतन अग्रवाल प्रकरणावर हिना खानची प्रतिक्रिया; म्हणाली, "त्याचा जीव वाचला असता...

प्रियकरासोबत पळून गेल्यास कुटुंबाची बदनामी झाली असती; मग होणाऱ्या नवऱ्यालाच दरीत ढकललं, केतन अग्रवाल प्रकरणात नवी माहिती

Mumbai : मुसळधार पावसात धावत्या लोकलमध्ये क्षुल्लक वाद विकोपाला; २२ वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या, आरोपी फरार