सिडकोच्या घरांच्या किमतीत १० टक्के कपात 
नवी मुंबई

सिडकोच्या घरांच्या किमतीत १० टक्के कपात; नवी मुंबईतील १७ हजार घरांची लॉटरी लवकरच

नवी मुंबईतील सिडकोच्या वेगवेगळ्या प्रवर्गातील घरांसाठी सिडकोने जे दर निश्चित केले होते. त्यामध्ये थेट १० टक्के कपात करण्यात येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत निवेदनाद्वारे केली. या निर्णयामुळे आता ही घरे पूर्वर्वीपक्षा स्वस्त दरात उपलब्ध होणार असून नवी मुंबई परिसरात घर घेण्याचे सर्वसामान्यांचे स्वप्न आता अधिक सुकर होणार आहे.

Swapnil S

नागपूर : नवी मुंबईतील सिडकोच्या वेगवेगळ्या प्रवर्गातील घरांसाठी सिडकोने जे दर निश्चित केले होते. त्यामध्ये थेट १० टक्के कपात करण्यात येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत निवेदनाद्वारे केली. या निर्णयामुळे आता ही घरे पूर्वर्वीपक्षा स्वस्त दरात उपलब्ध होणार असून नवी मुंबई परिसरात घर घेण्याचे सर्वसामान्यांचे स्वप्न आता अधिक सुकर होणार आहे.

सिडकोतर्फे नवी मुंबईतील खारघर, वाशी, खारकोपर, तळोजा, उलवे, कळंबोली, कामोठे आणि पनवेल या परिसरात तब्बल १७नवघरे बांधण्यात आला आहेत या घरांसाठीची लॉटरी प्रक्रिया येत्या दोन महिन्यांत पूर्ण केली जाणार आहे. त्यापूर्वी सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. इडब्ल्यूएस आणि एलआयजी या प्रवर्गातील घरांच्या किमती १० टक्के कमी होतील.

परवडणाऱ्या दरात अधिकृत घरे मिळणार!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांसाठी घरे या संकल्पनेला बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात अधिकृत आणि चांगल्या दर्जाची घरे मिळणे शक्य होणार आहेत.

डिझेल विक्रीवर मर्यादा! दिवसाला मिळणार केवळ २०० लिटर

Latur : सरकारने बैल दिला की थट्टा केली? औत लावताच आजारी बैलाने मान टाकली, लातूरच्या शेतकऱ्याची नव्या बैलाची मागणी

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात उज्ज्वल निकमांची एन्ट्री; कायदेशीर लढाईत विशेष सरकारी वकील म्हणून झाली नियुक्ती, बड्या नेत्यांचे धाबे दणाणले

Solapur : शेअर मार्केटच्या नादाने वाताहात; कर्जबाजारी मुख्याध्यापकाची कुटुंबासह आत्महत्या

नाशिक टीसीएस प्रकरणात ‘इस्लाम पार्टी’ची एन्ट्री; न्यायालयात दिला वकील, संशयितांना पुरवली जात आहे कायदेशीर मदत