नवी मुंबई

खराब हवामानामुळे जेएनपीटीत जहाजांचा खोळंबा

Swapnil S

उरण : खराब हवामानाचा फटका जेएनपीए बंदरात मालवाहू करणाऱ्या जहाजांनाही बसल्याने त्यांची वाहतुकीला विलंब होत असल्याचे चित्र पहावयास मिळाले. जहाजांच्या विलंबामुळे मात्र मागील ८ दिवसांपासून बंदरातील आयात- निर्यात मालाची वाहतूक काहीशी थंडावली आहे. यामुळे बंदराच्या प्रवेशद्वारापासून तीन-चार किलोमीटर अंतरापर्यंत कंटेनर मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रेलरच्या रांगा लागल्या आहेत. परिणामी होणाऱ्या विलंबामुळे नाशवंत मालाचे नुकसान होण्याची भीती व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

समुद्रातील खराब हवामानामुळे आणि काही तांत्रिक कारणांमुळे जेएनपीए बंदरात दाखल होणारी मालवाहू जहाजांचा वेळ २५ दिवसांवरून ४० दिवसांवर पोहोचला आहे. मालवाहू जहाजांना बंदरात दाखल होण्यासाठी होणाऱ्या विलंबामुळे जहाजातून कंटेनर उतरविणे आणि चढविण्यात अधिक वेळ जात आहे. त्यामुळे निर्यात होणाऱ्या मालाचे, हजारो कंटेनर ट्रेलर जेएनपीए बंदरांत अडकून पडले आहेत. परिणामी बाहेरून ये-जा करणाऱ्या कंटेनर वाहतुकीच्या ट्रेलर्सना जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे कंटेनरच्या रांगा जेएनपीए प्रवेशद्वारापासून ते पीयूबी इमारतीपर्यंत लागल्या आहेत.

मागील आठ-दहा दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे जेएनपीए बंदरातील कंटेनर वाहतूक थंडावली आहे. या वाहतूककोंडीमुळे नाशवंत मालाच्या कंटेनरचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कांदा, फळे, मांस यांसारखे पदार्थ रिफर कंटेनरमधून बाहेर पाठविले जातात. त्यांना ठरावीक वेळेनंतर चार्ज करावे लागतात किंवा वीजेवर सुरू ठेवावे लागतात. मात्र असे अनेक कंटेनर या वाहतूककोंडीत अडकल्यामुळे त्यातील मालाचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

तसेच हा माल तसाच थंड करण्यासाठी निर्यातदारांना मोठा खर्च सोसावा लागत असल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

एक जहाज गेल्यानंतरच त्याठिकाणी दुसरे लागते. त्यामुळे बंदरातही जागा रिक्त होण्यास विलंब होत आहे. मात्र वाहतूक सुरळीत होण्यास काही वेळ लागण्याची शक्यता आहे. सध्या ही परिस्थिती पूर्वपदावर येत आहे.

- एस. के. कुलकर्णी, डीजीएम, जेएनपीए

Jammu Kashmir Election : नंदनवनात आज अखेर मतदान; २४ जागांसाठी २१९ उमेदवार रिंगणात

One Nation, One Election ची अंमलबजावणी कधी? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मोठे विधान

सुप्रीम कोर्टाने रोखला 'बुलडोझर न्याय'! आमच्या परवानगीशिवाय एकही पाडकाम नको; पुढील सुनावणीपर्यंत आदेश

सगेसोयरे अधिसूचनेवर सरकारनियुक्त समित्यांचे काम सुरू; कोणत्याही समाजाची फसवणूक करणार नाही - मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कधी लागू होणार? गिरिश महाजनांनी वर्तवले भाकीत