Navi Mumbai : डीपीएस फ्लेमिंगो तलावाच्या संरक्षणासाठी एनजीटीत धाव; मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीअभावी संवर्धन राखीव दर्जा रखडला 
नवी मुंबई

Navi Mumbai : डीपीएस फ्लेमिंगो तलावाच्या संरक्षणासाठी एनजीटीत धाव; मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीअभावी संवर्धन राखीव दर्जा रखडला

नवी मुंबईतील १२ हेक्टर क्षेत्रफळाच्या डीपीएस फ्लेमिंगो तलावाला ‘संवर्धन राखीव’ दर्जा देण्याचा प्रस्ताव प्रलंबित असल्याने पर्यावरणवादी संघटनेने राष्ट्रीय हरित लवादाकडे (एनजीटी) धाव घेतली आहे.

Swapnil S

उरण : नवी मुंबईतील १२ हेक्टर क्षेत्रफळाच्या डीपीएस फ्लेमिंगो तलावाला ‘संवर्धन राखीव’ दर्जा देण्याचा प्रस्ताव प्रलंबित असल्याने पर्यावरणवादी संघटनेने राष्ट्रीय हरित लवादाकडे (एनजीटी) धाव घेतली आहे. महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाने १७ एप्रिल २०२५ रोजी या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. मात्र, आवश्यक अधिसूचना अद्याप जारी न झाल्याने तलावाला कायदेशीर संरक्षण मिळालेले नाही.

नैटकनेक्ट फाऊंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी याचिकेत तलावातील नैसर्गिक पाण्याचे मार्ग अडवल्याने भरती-ओहोटीचा प्रवाह बाधित होत असल्याचा आणि पाणी प्रदूषित होत असल्याचा आरोप केला आहे. कायदेशीर संरक्षणाअभावी तलाव सिडकोच्या नियंत्रणाखाली असून, त्याकडे विकसित करता येणारा भूखंड म्हणून पाहिले जात असल्याचेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

वन्यजीव विभागाने २८ ऑक्टोबर २०२५ रोजी संवर्धन राखीव दर्जासाठी प्रस्ताव सादर केला होता. मात्र, माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीसाठी प्रलंबित आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

दंड थकवणाऱ्यांना 'अभय'; दंडावर २० टक्के सवलत, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

Mumbai : सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टला मोठा दिलासा; राम मॅन्शनच्या खरेदी व्यवहारावरील मुद्रांक शुल्क माफ

दिवाळीआधी FDA ची मोठी कारवाई; राज्यव्यापी धडक मोहिमेत १८ अन्न व्यवसाय परवाने निलंबित, ४ आस्थापनांचे कामकाज केले बंद

दिवाळी अंक खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद; महागाईतही किंमती स्थिर, मराठी दिवाळी अंकांची ११७ वर्षांची परंपरा

चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धा : भारतीय पुरुष हॉकी संघ सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत