नवी मुंबई

अमली पदार्थ विक्रेत्यांचे मोडले कंबरडे, नवी मुंबई पोलिसांची धडक कारवाई

दीड वर्षामध्ये ८०३ कारवाया; ३० कोटी ८९ लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त

Swapnil S

नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्यांविरोधात नशामुक्त नवी मुंबई या विशेष मोहिमेअंतर्गत कारवाई करून शहरात सुरू असलेल्या अमली पदार्थाच्या विक्रीचे रॅकेट मोडीत काढले आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरातील अमली पदार्थाच्या खरेदी विक्रीला चांगलाच आळा बसला आहे. नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी कक्षाने गत दीड वर्षांच्या कालावधीत अमली पदार्थ, गुटखा विक्री आणि हुक्का अशा एकूण ८०३ कारवाया करून एकूण १२९८ आरोपींची धरपकड केली आहे. विशेष म्हणजे यात ५७ परदेशी नागरिकांचा समावेश आहे. पोलिसांनी या कारवाईत तब्बल ३० कोटी ८९ लाख रुपये किमतीचे वेगवेगळ्या प्रकारचे अमली पदार्थ जप्त केले आहेत.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाची खरेदी-विक्री होत असल्याचे तसेच या अमली पदार्थाच्या आहारी शाळा-कॉलेजमधील विद्यार्थी व तरुणवर्ग जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यास पुढाकार घेतला. त्यानुसार नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने व विविध पोलीस ठाण्यांनी १ जानेवारी २०२३ ते ३१ मे २०२४ या दीड वर्षांच्या कालावधीत विविध ठिकाणी छापे मारून अंमली पदार्थाच्या एनडीपीएस कलमांतर्गत एकूण ५९१ कारवाया केल्या. तसेच अंमली पदार्थांची तस्करी करणारे व बाळगणारे अशा एकूण ७०० आरोपींची धरपकड केली आहे.

या कारवाईत तब्बल २८ कोटी ५८ लाख ९० हजार रुपये किमतीचे वेगवेगळ्या प्रकारचे अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले आहे. यात कोकेन - ५ किलो २९१ ग्रॅम, ब्राऊनशुगर -३७४ ग्रॅम वजनाचे ३१ लाख ५८,९२० रुपये, हेरॉईन - ६० ग्रॅम वजनाचे ८ लाख ४७ हजार रुपये, मेफेड्रॉन-११ किलो ५६८ ग्रॅम वजनाचे ११ कोटी १७ लाख २८ हजार रुपये, मेथेड्रॉन-५५ ग्रॅम वजनाचे ५५ हजार रुपये, ट्रामाडोल टॅब्लेट्स १८२ किलो १०० ग्रॅम, एलएसडी पेपर ६ ग्रॅम ७४६ मि. ग्रॅम वजनाचे ५० लाख ४० हजार ७५० रुपये. त्याचप्रमाणे या अंमली पदार्थांचा समावेश आहे.

गुटखा व हुक्का पार्लरवर कारवाई

अमली पदार्थविरोधी पथकाने मागील दीड वर्षामध्ये गुटखा बाळगणाऱ्या व त्याची विक्री करणाऱ्यांवर २३९ कारवाया करून तब्बल २ कोटी १४ लाख ९९७४ हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित असलेला गुटखा व सुगंधीत पानमसाला जप्त केला आहे. या कारवाईत एकूण ५८८ आरोपींची धरपकड देखील केली आहे. तसेच शहरात छुप्या पद्धतीने चालणाऱ्या ७४ हुक्का पार्लरवर देखील पोलिसांनी कारवाई करून ३३० जणांना अटक केली आहे. तसेच ५ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे, तर ३८ कारवाया करून ४३ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच १० लाख ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नीरज चौधरी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अमली पदार्थविरोधी कक्ष

नशामुक्त नवी मुंबई अभियानाअंतर्गत शहरातील अंमली पदार्थाचे रॅकेट उद‌्ध्वस्त करून त्यांचे धंदे बंद करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यानुसार अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे अमली पदार्थाच्या दुष्परिणामाबद्दल नवी मुंबईतील शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम व उपक्रम देखील नियमित राबविण्यात येत आहेत. अमली पदार्थासंदर्भात नागरिकांना काही माहिती मिळाल्यास त्यांनी अमली पदार्थविरोधी कक्षाकडे अथवा स्थानिक पोलिसांना त्याबाबतची माहिती द्यावी. सदर माहितीच्या आधारे तत्काळ कारवाई करण्यात येईल.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

सांगलीत खताच्या कारखान्यात वायू गळती; तीन ठार, ९ जण रुग्णालयात